Husband and Wife viral news: लग्नानंतर एक जोडपे हनिमूनसाठी बँकॉकला गेले. मात्र, पती जवळ घेत नसल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने तिच्या आईला हा प्रकार सांगण्यासाठी पतीचा फोन घेतला. यावेळी पतीचे मोठे गुपित समजल्याने विवाहिता हादरली. पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे तिला पतीच्या व्हॉट्सॲप चॅट मधून समजले. लग्नापूर्वी ही बाब लपवून ठेवल्याने तरुणीने व हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी विवाहितेने थेट पोलीसांत जात पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
एका तरुणाने कानपूरमधील तरुणीशी लग्न केले. हुंड्यात लाखो रुपये आणि दागिने घेतल्यानंतरही मुलीवर सासरच्या घरात अत्याचार सुरूच होते. दरम्यान, लग्न होऊनही पती तिला जवळ घेत नव्हता. लग्नाच्या काही दिवसानंतर दोघेही हनिमूनसाठी बँकॉकला गेले. येथेही पतीच्या उदासीन भूमिकेमुळे पत्नी चांगलीच त्रस्त झाली. तिने हा प्रकार आपल्या आईला सांगण्यासाठी पतीचा फोन हाती घेतला. दरम्यान, तरुणीला पतीच्या फोनवर एका व्यक्तीचा फोन आला. तिने या नंतर पतीचे व्हॉट्सॲप चॅट तपासल्यावर तिचा नवरा हा समलैंगिक असल्याचे उघड झाले. ऐवढेच नाही तर तिच्या नवऱ्याला केस नसून तो विग घातल्याचे पाहूनही विवाहिता हादरली.
या घटनेमुळे पत्नीला धक्का बसला. ही बाब लपवून ठेवून आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने केला. हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर विवाहितेच्या वडिलांनी ठाकूरगंज पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कानपूर कर्नलगंज येथील रहिवासी असलेल्या या विवाहितेचे लखीमपूर खेरी मिसराना येथील एका मुलाशी २९ जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले होते. जो गुरुग्राममधील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ठाकूरगंज येथील बाबियन इम्पीरियल येथे लग्न धडाक्यात पार पडले. मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नात हुंड्यासह सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात आले.
पती समलैंगिक असल्याचे लपवल्याने तसेच हुंड्यासाठी लग्न केल्याने विवाहितेने तिच्या पतीविरुद्ध थेट पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तिने तिला मारहाण करण्याचा देखील आरोप केला आहे. मुलगा हा समलैंगिक असल्याबद्दल त्याच्या पालकांना माहिती असतांनाही त्यांनी लग्न लावून दिले असा आरोप देखील विवाहितेने केला आहे. केवळ हुंड्यासाठी लग्न केले असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.