Viral Video: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल, व्हिडिओवर कमेंटचा पाऊस!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल, व्हिडिओवर कमेंटचा पाऊस!

Viral Video: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल, व्हिडिओवर कमेंटचा पाऊस!

Jan 27, 2025 05:26 PM IST

Mahakumbh Viral Video: महाकुंभात नवरा हरवू नये म्हणून एका महिलेने आगळीवेगळी शक्कल लढवली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 व्हायरल व्हिडिओ: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल
व्हायरल व्हिडिओ: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल

Viral News: महाकुंभ २०२५ मध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. मौनी अमावास्येला महाकुंभात १० कोटी लोक स्नान करतील, असा अंदाज आहे. तर, २५ आणि २६ जानेवारीला मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. मौनी अमावस्येमुळे महाकुंभात गर्दी वाढू लागल्याने प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेत आहेत. अशातच महाकुंभातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने आपल्या पतीला हरवू नये म्हणून भन्नाट आयडिया लढवली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

रासगनियासरजीत नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘महाकुभात तुमच्या जोडीदाराला असेच बांधून ठेवा.’ या व्हिडिओत महिलेने आपल्या पतीला दोरीने बांधले आहे. तर, दोरीचे दुसरे टोक आपल्या हातात घेतले आहे. महिलेने आपल्या डोक्यावर ओझे घेतले आहे. तर, पतीने त्याच्या डोक्याला कपड्याने गुंडाळले आहे आणि त्याच्या हातात बॅग आहे.

महाकुंभातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की,  ‘खरे जीवनसाथी, देवाने यांची जोडी अशी कायम ठेवू दे.’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘पंचावन्न म्हणजे प्रेम.’ तर, एका युजर म्हटले आहे की, ‘महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. देव दोघांना आशिर्वाद दे. पण काही लोक दोघांची खिल्ली उडवत आहेत.’  आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘आपल्या जोडीदारापासून विभक्त होण्याची भीती काय असते हे यावरून सिद्ध झाले.' तर, काही जणांनी प्रेमाचे इमोजी शेअर केले आहेत.

दरम्यान, २९ जानेवारी २०२५ ला मौनी अमावास्येपूर्वी प्रयागराज महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि महामार्गावर भाविक दिसतात. गेल्या दोन दिवसांत (शुक्रवार आणि शनिवार) सव्वा कोटींहून अधिक लोकांनी महाकुभांत स्थान केले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मेळा प्रशासन आणि कुंभमेळा पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण मेळा परिसर नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. भाविकांच्या ये-जा करण्यासाठी प्रत्येक सेक्टर आणि झोनमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

याआधीही महाकुंभासंदर्भात अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यामुळे अनेक साधू, संत चर्चेत आलेे आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर