Viral News : आजारपणामुळे कणखर शरीराने एका व्यक्तिची साथ सोडली. यामुळे तब्बल तो सहा वर्ष अंथरुणाला खिळून राहिला. या काळात त्याच्या अनेक मित्रांनी व नातेवाइकांनी त्याची साथ सोडली. मात्र, त्याची पत्नी एकनिष्ठ राहत खंबीरपणे त्याच्या सोबत राहिली. या काळात तिने त्याची भरपूर सेवा केली. त्यांची आंघोळ करण्यापासून ते खाऊ पीऊ घालण्यापर्यंत सर्व काही त्याने केले. तिच्या या सेवेला यश आले आणि तिचा नवरा चालू फिरू लागला. दरम्यान, बरा होताच पत्नीने केलेली सेवा तो विसरला व दुसरी महिला आयुष्यात येताच त्याने पत्नीला घटस्फोट दिला. हे प्रकरण मलेशियाचे आहे, जिथे एक व्यक्ति बरा होताच त्याने वर्षानुवर्षे त्याची काळजी घेणाऱ्या पत्नीला सोडून दिले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलेशियातील एक व्यक्ती २०१८ च्या सुमारास कार अपघाताला गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याला लागलेल्या मारामुळे तो अंथरूणाला खिळून पडला होता. अपघात होण्यापूर्वी त्याने २०१६ मध्ये त्याने नुरुल सैजवानी नावाच्या महिलेशी लग्न केले होते. दोघांना एक मूल आहे. या वाईट काळात नुरुल नेहमीच तिच्या पतीसोबत खंबीर पणे सोबत राहिली. यावेळी पतीचे डायपर बदलणे, आंघोळ करणे अशी सर्व कामे तिने कोणतीही तक्रार न करता केली.
दरम्यान, २०१९ मध्ये नुरुलने सोशल मीडियावर तिचे अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे हजारो नागरिक तिचे फॉलोअर्स झाले. तिने नुकत्याच केलेल्या एका फेसबुक पोस्टने तिच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला हे. रिपोर्ट्सनुसार, नुरुलने तिच्या एका लग्नाचा फोटो पोस्ट शेअर केला. ज्यात तिचा नवरा हा दुसऱ्या महिले सोबत लग्नाच्या वेशात दिसत होता. इतकेच नाही तर तिने नरूलने तिच्या पतीला नव्या लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या.
नरुलने फेसबूक पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या पतीला शुभेच्छा. मला आशा आहे की आपण ज्यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडतो त्यांच्यासोबत आपण आनंदी असू. मी आयफा एझाम प्लीज याच्याशी लग्न केले. तो अपघातानंतर तब्बल ६ वर्ष अंथरूणाला खिळून पडला. या काळात मी त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याची काळजी घेतली. मात्र, तो बरा होताच त्याची गरज संपली. त्याने मला सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केलं आहे. नूरूलने ६ ऑक्टोबरला तिच्या पतीला घटस्फोट दिल्याची माहिती दिली. घटस्फोटानंतर आठवडाभरातच तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याचे वृत्त आहे.
संबंधित बातम्या