मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  २५ वर्षीय तरुणाचा हार्टअटॅकने मृत्यू, दु:खी पत्नीनेही ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

२५ वर्षीय तरुणाचा हार्टअटॅकने मृत्यू, दु:खी पत्नीनेही ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 27, 2024 06:06 PM IST

Husband Wife Death : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेही सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.

Husband Wife Death
Husband Wife Death

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २४ तासात एका तरुण दाम्पत्याच्या मृत्यूने कुटूंबाला धक्का बसला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे. २५ वर्षीय अभिषेकला दिल्लीत प्राणीसंग्रहालय फिरताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याला तत्काळ सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्का त्याची नवविवाहित पत्नी अंजलि  पचवू शकली नाही व तिने इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा प्रकारे तीन महिन्याच्या वैवाहिक जीवनानंतर २४ तासांच्या आत दोघांनी या जगाचा निरोप घेतला. 

दोघांचा विवाह गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी झाला होता. सोमवारी अभिषेक आणि अंजली प्राणीसंग्रहालय फिरण्यासाठी गेले होते. कुटूबांतील सदस्यांनी सांगितले की, झू पार्कमध्ये फिरताना अभिषेक अहलुवाली याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर अंजलीने अभिषेकच्या मित्रांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्याला आधी जीटीबीमध्ये दाखल केले व तेथून सफदरजंग रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. 

सोमवारी रात्री ९ वाजता अभिषेकचा मृतदेह वैशालीनगरमधील त्याच्या घरी आणण्यात आला. तीन महिनेच सोबत राहिलेल्या अंजलीला पतीच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला. त्यामुळे तिने सोमवारी रात्रीच बिल्डिंगच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल केले मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अभिषेकला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अंजली घरी आली होती. दरम्यान अभिषेकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला. मृतदेह पाहून अंजलीला मोठा धक्का बसला. तिने सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. रुग्णालयात तिचाही मृत्यू झाल्याने कुटूंबाला दुहेरी धक्का बसला. मुलासोबत सूनेचाही मृत्यू झाला.

IPL_Entry_Point

विभाग