राजस्थानमधील अलवरमध्ये पतीला धोका दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती कावड यात्रेसाठी (kanwadyatra) हरिद्वारला गेला होता. दरम्यान रस्त्यात असतानाच त्याच्या वडिलांचा फोन आला. त्यानंतर दिल्लीमध्ये आपल्या मित्राच्या घरी कावड ठेऊन घरी परतला. घरी आल्यावर त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. जाताना तिने घरातील सर्व दागिने व पैसे घेऊन गेली.
ही घटना अलवर येथील रैणी क्षेत्रातील आहे. येथील एक व्यक्ती कावड घेऊन हरिद्वारला गेला होता. दरम्यान त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. पत्नी घरातून गायब झाल्याची माहिती मिळताच तो दिल्लीत आपल्या मित्राच्या घरी कावड घेऊन घरी परतला. घरी येऊन पाहिले तर पत्नी घरात कावड कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेले दीड लाख रुपयेही घेऊन गेली.
विवाहितेचा पती आपल्या मित्रांसोबत कावड यात्रेसाठी हरिद्वारला गेला होता. घरात त्यांचे दिव्यांग वडील, पत्नी आणि मुलगा होता. घरातून जाताना पत्नीने सांगितले की, मी वडील व मुलाची काळजी घेऊन. मात्र पती घरातून बाहेर पडताच तिनेही प्रियकरासोबत पोबारा केला. गावात येताच पतीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केली आहे.
तरुणाने सांगितले की, महिला घरातून सोन्या चांदीचे दागिने व घरात ठेवलेले जवळपास दीड लाख रुपये आपल्यासोबत घेऊन गेली आहे. तरुणाने सांगितले की, गावात कावड कार्यक्रमासाठी दीड लाख रुपये जमा केले होते. तरुणाने ते पैसे पत्नीकडे ठेवायला दिले होते. गावात जेव्हा कावड घेऊन सर्व लोक परत आल्यानंतर एक कार्यक्रम आयोजित केला जाणार होता. त्यासाठी वर्गणी काढून पैसे जमा केले होते. याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. नेटीझन्सकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत.
पोलिसांनी सांगितले की, महिला आपल्या मर्जीने आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. अलवर पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास सुरू आहे. महिला दागिने व पैसे घेऊन फरार झाली आहे. महिलेची लोकेशन ट्रेस केली जात आहे. त्याचबरोबर लोकांची चौकशी केली जात आहे.
संबंधित बातम्या