Viral news : तैवानमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीनं आरोप केला आहे की, त्याची पत्नी ही त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी पैशांची मागणी करते. या मुळे त्या व्यक्तीनं घटस्फोटासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली असून कोर्टानं दोघांचा घटस्फोट मान्य केला आहे. याआधी महिला पतीपासून वेगळे होण्यास विरोध करत होती. मात्र, हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने आता तिला पतीपासून विभक्त व्हावे लागणार आहे. मात्र, ही पहिलीच घटना नाही. याआधीही २०१४ मध्ये तैवानमध्येच एक महिला सेक्स, संभाषण आणि जेवणाच्या बदल्यात पतीकडून रोख रक्कम वसूल करत असल्याचं वृत्त पुढं आलं होतं.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हाओ (नाव बदलले आहे) नावाच्या व्यक्तीला त्याची पत्नी झुआन (नाव बदलले आहे)ने शरीर संबंध ठेवण्यापूर्वी वारंवार रोख पैशांची मागणी करत होती. जर पैसे दिले नाही तर ती शरीर संबंध ठेवण्यास नकार देत होती. सुरवातीला काही दिवस पतीनं पत्नीचे हे नखरे सहन केले. मात्र, रोज रोज हे घडत असल्याने वैतागलेल्या पतीने थेट कोर्टात धाव घेतली. कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून निकाल पतीच्या बाजूने देत घटस्फोट मंजूर केला.
या दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले व या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. हाओचा दावा आहे की, २०१७ मध्ये त्याच्या पत्नीने त्याला महिन्यातून एकदाच शरीर संबंध ठेवण्याची अट घातली होती. तर २०१९ मध्ये तिने त्याला कोणतेही कारण न देता पूर्णपणे नाकारले होते.
रिपोर्टनुसार, हाओ म्हणते की झुआनने तिच्या नातेवाईकांसमोर तिची 'खूप लठ्ठ' आणि 'अनफिट' असे वर्णन करत बदनामी केली. विशेष बाब म्हणजे हाओने २०२१ मध्ये घटस्फोटासाठी अर्जही केला होता, परंतु शुआनने संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर खटला मागे घेऊन पतीने पत्नीच्या नावावर मालमत्ता नोंदवली. यानंतर शुआनने हाओला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. इतकंच नाही तर त्याला जेव्हा जेव्हा शरीर संबंध ठेवायची इच्छा होत असे तेव्हा तेव्हा ती पैसे घेऊ लागली.
वृत्तपत्राशी बोलताना हाओने सांगितले की, तिने यावर्षी पुन्हा त्याच्याविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला. गेल्या दोन वर्षांपासून दोघांनी बोलणे बंद केले आहे. खूप महत्वाचे असेल तर ते फक्त मेसेजिंग ॲपद्वारेच संभाषण ठेवतात. या जोडप्याने समुपदेशनाचीही मदत घेतली, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी घटस्फोटाची हाओची विनंती मान्य केली. विशेष म्हणजे शुआनला घटस्फोट घ्यायचा नव्हता आणि तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र, येथेही तिचे अपील फेटाळण्यात आले.