Viral Video: आधी ड्रेस खेचला मग...; सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा रुद्रावतार!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: आधी ड्रेस खेचला मग...; सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा रुद्रावतार!

Viral Video: आधी ड्रेस खेचला मग...; सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा रुद्रावतार!

Nov 18, 2024 02:07 PM IST

Wife Catches Husband Red-Handed With Girlfriend: सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर संतापलेल्या महिलेने काय केले? पाहा

सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा रुद्रावतार!
सरपंच पतीला गर्लफ्रेन्डसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा रुद्रावतार!

Ujjain Sarpanch Viral Video: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील सरपंचाच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संबंधित महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसह रंगेहात पकडल्यानंतर रस्त्यातच गोंधळ घातला. यानंतर सरपंच याच्या पत्नीने त्या महिलेला बेदम मारहाण केली. यावेळी लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सरपंच एका महिलेसह कारमध्ये बसलेला दिसत आहे. तर, त्याची पत्नी कारच्या बाहेर उभा आहे. कारमधील महिला आम्ही लग्न करणार असल्याचे बोलत आहे. हे ऐकताच सरपंच याच्या पत्नीला राग अनावर होतो आणि ती शिवीगाळ करण्यास सुरुवात करते. यानंतर कारमधील महिलेला कारमधून बाहेर ओढून तिला बेदम मारहाण करते. सरपंच याच्या पत्नीने रस्त्यात घातलेला गोंधळ पाहून लोकांनी प्रचंड गर्दी केली.

@gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा वाद, पत्नीने प्रेयसीसोबत लाँग ड्राईव्हला जाताना सरपंच पतीला पकडले. त्यानंतर सरपंचाच्या पत्नीने त्यांच्या गर्लफ्रेन्डला भररस्त्यात मारहाण केली.' या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे एक कोटी व्ह्यूज आणि सुमारे ६ हजार लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या विवाहबाह्य संबंधात दोघांचीही चूक आहे. मग एकट्या महिलेला शिक्षा का? अशा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'आम्ही याचा आनंद घेत आहोत, पण ज्यांच्यासोबत असे घडले, त्यांना हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटत असेल.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'पतीलाही मारहाण केली पाहिजे होती, यात एकट्या महिलेचा दोष नाही.'

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर