Viral News : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने मत्सरातून तिच्या पतीचे लिंग वस्तऱ्याने कापून टाकले. लिंग कापल्यावर तिने ते टॉयलेटमध्ये फेकून दिले. या घटनेनंतर पत्नी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तिने केलेल्या गुन्हाची तिने कबुली दिली. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायालयाने पत्नीला ५ वर्षांची शिक्षा दिली. मात्र, महिलेच्या पिडीत पतीने पत्नीला माफ केले असून तो पुन्हा तिच्यासोबत राहण्यास तयार झाला आहे. पत्नीच्या या कृत्यासाठी त्याने स्वत:लाच जबाबदार धरले आहे.
मिररच्या वृत्तानुसार, फिर्यादी पतीने ट्याच्या पत्नी विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी पत्नी डायने डॉस सँटोस, फारियासने तिचा गुन्हा कबूल केला आहे. फारियासने तिचा पती गिल्बर्टो नोगुएरा डी ऑलिवेरा याला शरीर संबंध ठेवण्यासाठी बोलावले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही घटना घडली होती. यानंतर महिलेने पतीला पलंगावर बांधले आणि खोलीतील लाइट बंद केले. यानंतर तिने अंधारात बेसावध असलेल्या पतीचे वस्तऱ्याच्या साह्याने लिंग कापले व टॉयलेटमध्ये फेकून दिले.
रिपोर्ट्सनुसार, ३४ वर्षीय फरियासने पट्टीसोबत समेट केला आहे. खटल्यासाठी कायदेशीर टीमची फी तिच्या पतीने भरली आहे. तथापि, या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश रॉबर्टा लागुना चिपेटा ते मोरेस बारो यांनी १५ मे रोजी तिला ४ वर्षे ५ महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कमीत कमी ८ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या गिलबर्टोला पतीने प्रोस्थेटिक पेनिस लावले आहे. रिपोर्टनुसार, या घटनेसाठी त्याने स्वत:ला जबाबदार धरले आहे. तो म्हणाला, 'सगळी माझी चूक होती. मी माझ्या भाचीसोबत संबंध ठेऊन माझ्या पत्नीची फसवणूक केली. मी जर असे नसते केले तर माझी पत्नी माझ्याशी अशी वागली नसती. 'डियान एक समजूतदार पत्नी आहे, जी माझ्यावर प्रेम करते.' २२ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर फरियासने स्वत: पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे.