Sugauli tripal murder : बिहारच्या पूर्व चंपारण येथील सुगौली जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे दोघांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्याने संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांची हत्या केली आहे. त्यांचे मृतदेह घरात एका पोत्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नेपाळमधील चितवन येथील नारायण घाटात पतीने महिला आणि तिच्या प्रियकराची गळा आवळून हत्या केली. यानंतर मृतदेह गोणीत ठेवून घरात लपवून ठेवले.
सुगौली पोलीस स्टेशन क्षेत्रातील सुगाव दिह गावातील रहिवासी अखिलेश प्रसाद असे आरोपी पतीचे नाव आहे. तर त्याची पत्नी स्मिता देवी, प्रियकर ऋषभ कुमार, रितेश कुमार अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. रीतेशचा मृतदेह सापडला नाही. पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. स्मिताचा पती अखिलेश कुमार याची चौकशी केल्यानंतर तिघांच्याही हत्येचा उलगडा झाला. सुगौली पोलीसांनी अखिलेशला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये नेपाळमधील नारायण घाट चितवन येथील एका घरातून दोन पोत्यांमध्ये दोन मृतदेह सापडले. हा प्रकार कळताच ऋषभच्या वडिलांनी दोन्ही मृतदेहांची ओळख पटवली. पोलिस निरीक्षक अमित कुमार सिंह यांनी सांगितले की, रितेशच्या अपहरणाप्रकरणी स्मिताचा पती अखिलेश याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. यात त्याने त्यांची हत्या केल्याचे सांगितले.
त्याने दिलेल्या माहितीनुसारत्याची पत्नी स्मिता देवी हीचे प्रियकर ऋषभ कुमार आणि रितेश कुमार यांच्याशी प्रेमसंबंध होते. याची माहिती ही अखिलेशला मिळाली. पत्नीचे अफेअर असल्याने त्याचा संताप झाला. अखिलेशने २३ ऑक्टोबर रोजी रितेशला बोलावून त्याची हत्या केली आणि ऋषभच्या मामाचे गाव खाप गोपालपूर गावातील सारेहमध्ये त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला. यानंतर ऋषभ आणि अखेलिशची पत्नी स्मिता दोघेही नेपाळमध्ये पळून जाऊन चितवन येथे राहू लागले. अखिलेशने नेपाळमध्ये जाऊन संधी मिळताच एक एक करून दोघांचाही गळा आवळून खून केला.
कुटुंबीयांनी रितेश बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केली. चौकशीदरम्यान अखिलेशने तिघांची हत्या केल्याचे सांगितले. त्याने फुलवारिया येथे नातेवाइकांना भेटायला जात असल्याचे सांगत, तिघांचीही हत्या केली.