विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड

विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड

Nov 18, 2024 09:08 AM IST

Noida widow aunty murdere case : ग्रेटर नोएडाच्या जारचा कोतवाली भागात एका गावात एका ३२ वर्षीय विधवा महिलेचा तिच्या पुतण्याने चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे.

विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड
विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड (Getty Images/iStock photo)

Noida widow aunty murdere case : ग्रेटर नोएडाच्या जारचा कोतवाली भागातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय विधवा महिलेने तिच्या पुतण्याशी संबंध ठेवले. यानंतर तिचा जीव दुसऱ्या व्यक्तिवर जडला. याची कुणकुण लागल्याने   विधवा महिलेच्या  पुतण्याने तिचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिस तपासात महिलेचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं  निष्पन्न झालं आहे. तर एक कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या मामाने केला आहे. पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली असून या खुनाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडामधील कलोंडा गावातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांची ३२ वर्षीय विधवा पत्नी तिच्या  पाच मुलांसोबत सासरच्या मंडळींसोबत राहत होती. शनिवारी रात्री एकच्या सुमारास कुटुंबातील पुतण्या शाहरुख (वय २८) याने घरात घुसून चाकूने महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर  आरोपी थेट पोलिस ठाण्यात गेला आणि  पोलिसांना शरण गेला.  या घटनेने पोलिस देखील चक्रावले. 

विधवा महिलेचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानंतर या महिलेचे गावातील आणखी एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं आहे.  दरम्यान, मृत महिलेच्या सासरच्यांकडे कोट्यवधी रुपयांची जमीन असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांचा तिच्या नावावर असलेली जमिन हडपण्याचा हेतू कुटुंबाचा होता असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, त्यांची मुलगी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. 

विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड
विधवा काकूने ठेवले पुतण्याशी संबंध! नंतर दुसऱ्यावर जडला जीव; प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं भयंकर कांड (@noidapolice Twitter)

१५ दिवसांपूर्वी घरात जागेवरून वाद झाला होता. या वादातून हत्या झालेली महिला ही  माहेरी गेली होती. शुक्रवारी ती पुन्हा सासरी परतली आणि शनिवारी रात्री पुतण्याने तिची चाकूने गळा चिरून  हत्या केली. या हत्येत सासरच्या इतर मंडळींचाही सहभाग असल्याचा आरोप खून झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.

आरोपी पुतण्या विवाहित 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा विवाह १७ वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीशी झाला होता. त्याच्या पासून मृत महिलेला पाच मुले आहेत. तिची मोठी मुलगी १६ वर्षांची आहे. महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. शेजारी राहणारा पुतण्या महिलेच्या घरी आला होता. पतीच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अनैतिक संबंध निर्माण झाले. २८ वर्षीय आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.  

महिलेचे आणखी एकाशी प्रेमसंबंध 

आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी त्याने महिलेला गावातील कोणाशी तरी बोलताना पाहिले होते. हळूहळू महिलेने आरोपीशी संपर्क ठेवणे देखील बंद केले. यावरून  दोघांमध्ये फोनवर भांडण झाले होते. दरम्यान, ही महिला आपल्या माहेरी गेली. शुक्रवारी ही महिला सासरच्या घरी परतली. शनिवारी संधी पाहून आरोपी पुतण्याने महिलेच्या घरात जाऊन चाकूने गळा चिरून तिची  हत्या केली. हत्येच्या वेळी महिलेची मुलगी आणि सासू जाते होत्या अशी माहिती आहे.  त्यांच्यासमोरच हा  खून करण्यात आला. हत्येनंतर महिलेचे कुटुंबीय हादरले आहेत.

ग्रेटर नोएडाचे एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी तपासात महिलेचे खून हा पुतण्यासोबत अनैतिक संबंधातून झाला असल्याचं समोर आलं आहे. महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याने आरोपी नाराज होता. पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. "

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर