चंडीगड महापौर निवडणूक मतपत्रिकेवर क्रॉस मार्क का केलं? सुप्रीम कोर्टानं अधिकाऱ्याला फटकारलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चंडीगड महापौर निवडणूक मतपत्रिकेवर क्रॉस मार्क का केलं? सुप्रीम कोर्टानं अधिकाऱ्याला फटकारलं

चंडीगड महापौर निवडणूक मतपत्रिकेवर क्रॉस मार्क का केलं? सुप्रीम कोर्टानं अधिकाऱ्याला फटकारलं

Feb 19, 2024 07:27 PM IST

SC On chandigarh Mayor election : बॅलेट पेपर्समध्ये छेड़छाड़ केल्याच्या आरोपात सुप्रीम कोर्टाने सोमवारी चंदीगड महापौर निवडणूक अधिकाऱ्याला चांगलेच फटकारले.

SC On chandigarh Mayor election
SC On chandigarh Mayor election

चंडीगड महापौर निवडणुकीत बॅलेट पेपर्समध्ये छेडछाड़ केल्याच्या आरोपात सुप्रीम कोर्टाने सोमवारी निवडणूक अधिकाऱ्याला चांगलेच फटकारले. न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांना फटकारताना म्हटले की, तुम्ही बॅलेट पेपर्स वर X चे निशाण का बनवले. यावर अनिल मसीह यांनी उत्तर दिले की, त्यांनी बॅलेट पेपर्सवर हे निशाण बनवले ज्या मतपत्रिका अवैध होत्या. अशा ८ मतपत्रिका होत्या.

दरम्यान अनिल मसीह यांच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. यावर न्यायालयाने विचारले की, बॅलेट पेपर्स सुरक्षित आहे का? त्यांनी होय असे उत्तर दिल्यानंतर न्यायालयाने ते सादर करण्यास सांगितले.

ज्या मतपत्रिकेवर निवडणूक अधिकाऱ्याने क्रॉस मार्क केला आहे त्या उद्या आम्हाला दाखवा," अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. याप्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. देशात निवडणुकांमध्ये होत असलेल्या घोडेबाजाराबाबत आम्ही चिंतेत आहोत. हा खूप गंभीर प्रकार असल्याचे न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप व काँग्रेस एकत्र येऊनही भाजपने ही निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ही निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने घोळ घालत भाजप उमेदवाराला जिंकण्यासाठी मदत केल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता. यायाबत सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली होती. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना चांगलच फटकारलं.

दरम्यान निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी रविवारीआपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर