ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू

ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू

Nov 10, 2024 07:02 AM IST

American woman Protest against Donald Trump : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारात ट्रम्प यांना स्त्रीवादविरोधी म्हणून संबोधण्यात आलं होतं, ज्यामुळे अनेक महिलांना ट्रम्प यांच्या पराभवाची आशा होती. मात्र, ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे महिलांनी फोर बी चळवळ सुरू केली आहे.

ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू
ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू

American woman Protest against Donald Trump : २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेतील लाखो जण दुखवले आहेत. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महिलांनी  ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला ‘फोर बी चळवळ’ असं नाव देण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने अमेरिकन महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या चळवळीअंतर्गत महिलांनी  सेक्स, नातेसंबंध, लग्न आणि मुलं जन्माला घालण्यास नकार दिला आहेत. ही चळवळ सुरुवातीला दक्षिण कोरियातून सुरू झाली होती आणि आता ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत ही चळवळ झपाट्याने वाढू लागली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या चळवळी अंतर्गत अनेक महिलांनी सेक्स स्ट्राइकवर (शरीरसंबंधांचा संप) जाण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे महिलांचे संरक्षण व  गर्भपातविषयक हक्कांवर काही परिणाम होण्याच्या शक्यतेच्या भीतीने महिलांनी या आंदोलनाची घोषणा केली असल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे.  

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारात ट्रम्प यांना स्त्रीवादविरोधी म्हणून संबोधण्यात आले होतं, ज्यामुळे अनेक महिलांना ट्रम्प यांच्या पराभवाची आशा होती. मात्र, अनेक अमेरिकन महिलांनी  सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या विजयाबद्दल निराशा आणि रागाच्या भावनेतून ४  बी चळवळीत सामील झाल्याची घोषणा केली आहेत. नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोरियन शब्द "बी" वरून या चळवळीचे नाव पडले आहे. दक्षिण कोरियात #MeToo आणि 'एस्केप द कॉर्सेट' सारख्या चळवळीनंतर ही चळवळ उदयास आली, ज्यामुळे तेथील समाजात लक्षणीय बदल झाले.

दक्षिण कोरियन स्त्रीवादी वर्तुळात आणि २०१० च्या दशकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धापर्यंत सोशल मीडियावर महिलांवरील हिंसाचाराच्या लाटेदरम्यान आणि दक्षिण कोरियन समाजातील लैंगिक भेदभाव आणि विषमतेच्या इतर अभिव्यक्तींच्या विरोधात ही चळवळ सुरू करण्यात आली होती.   4 बी हे चार शब्दांचे संक्षिप्त रूप आहे जे "बी" पासून सुरू होते, ज्याचा अर्थ कोरियन भाषेत "नाही" असा होतो.

"4 बी" मध्ये चार मुख्य गोष्टी आहेत:

बीहोन्ग (Birthing): मुले न होण्याचा निर्णय.

बिहोन (Marriage): लग्न न करण्याचा निर्णय.

बीचोख (Dating): डेटिंग न करण्याचा निर्णय.

बीसेक्स (Sex):  सेक्स न करण्याचा निर्णय.

फोर बी मूव्हमेंट दक्षिण कोरियात २०१९  साली सुरू झाली. पितृसत्ताक पद्धतीशी लढण्यासाठी तिथल्या महिलांनी हा नवा दृष्टिकोन अंगीकारत आंदोलंन सुरू केलं. त्या माध्यमातून त्या हेटेरोसेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये सहभागी होत नाहीत. त्यात चार गोष्टींचा समावेश असतो. पुरुषांशी सेक्स नाही (bisekseu), डेटिंग नाही (biyeonae), विवाह नाही (bihon) आणि पुरुषांकडून मूल होऊ द्यायचं नाही (bichulsan) या चार गोष्टींचा समावेश या चळवळीत करण्यात येतो.  अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुढची चार वर्षं सत्तेवर असतील, तोपर्यंत अशी चळवळ राबवण्याचं या महिलांनी म्हटलं आहे.

दक्षिण कोरियन समाजात पुरुषी हिंसेला स्त्रिया कंटाळल्या आहेत. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार गेल्या नऊ वर्षांत दक्षिण कोरियात किमान ८२४ महिलांची हत्या झाली आहे. तर  ६०२ महिलांना त्यांच्या साथीदारांकडून होणाऱ्या हिंसाचारामुळे मृत्यूचा धोका आहे. पण त्यात आर्थिक घटकही आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या (ओईसीडी) आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियातील पुरुष महिलांपेक्षा सरासरी ३१.२ टक्के जास्त कमावतात. दक्षिण कोरियन समाज कुटुंबाच्या बाबतीतही बराच पुराणमतवादी आहे. कोपनहेगन विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागातील प्राध्यापक अयो वाहलबर्ग यांनी अल जझीराला सांगितले की, मुलांची काळजी घेणे आणि घरातील कामे, तसेच वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी सहसा महिलांवर असते. परंतु, वाढत्या महागाईमुळे महिलांना घराबाहेर काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही, म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या या वाढल्या आहेत.

अहवालानुसार, दक्षिण कोरियात या चळवळीचा प्रभाव इतका मोठा होता की २०२१  मध्ये राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांनी या आंदोलनाचे वर्णन हे  "महिला आणि पुरुषांमधील संबंधांमधील  अडथळा" म्हणून केले होते. या चळवळीचा कोरियातील जन्मदरावरही परिणाम झाला.  आता अमेरिकन स्त्रिया या चळवळीत सामील होत आहेत.  विशेषत: ज्यांना आशा होती की कमला हॅरिस यांच्या विजयामुळे त्यांच्या प्रजनन हक्कांचे रक्षण होईल. पण ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलांनी ४ बी चळवळ सुरू केली आहे.  आपल्या हक्कांची आणि स्वातंत्र्याची जाणीव महिला या आंदोलनातून करून  देत आहेत. फोर बी चळवळीत त्यांनी  निषेध म्हणून लैंगिक संबंध ठेवू नयेत,  लग्न करू नये आणि मुले होऊ नयेत अशी शपथ घेतली आहे.

येल विद्यापीठातील समाजशास्त्रविषयात पीएचडी करणाऱ्या मीरा चोई यांनी एनबीसीला सांगितले की, "महिलांना असे वाटू लागले आहे की सरकार आणि पुरुष त्यांना अपयशी ठरवत आहेत." महिलांना स्वत:च्या शरीराविषयी निर्णय घेण्याची ताकद असावी, हा या चळवळीमागचा हेतू आहे. मात्र, या आंदोलनावर सोशल मीडियावर टीकाही होत आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर