कापलेले कलिंगड कसे बनले इस्त्रायल विरोधाचे प्रतीक? गाझा ते लंडनच्या रस्त्यांवर लोकांचे प्रदर्शन-why watermelon becomes symbol of palestine movement against israel ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कापलेले कलिंगड कसे बनले इस्त्रायल विरोधाचे प्रतीक? गाझा ते लंडनच्या रस्त्यांवर लोकांचे प्रदर्शन

कापलेले कलिंगड कसे बनले इस्त्रायल विरोधाचे प्रतीक? गाझा ते लंडनच्या रस्त्यांवर लोकांचे प्रदर्शन

Jan 17, 2024 04:23 PM IST

Watermelon Symbol Of Palestine Movement : १९६७ मध्ये इस्त्रायल आणि आखाती देशांमध्ये भीषण संघर्ष उफाळला होता. त्यावेळी इस्त्रायलने गाझा व वेस्ट बँकेतपॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन प्रदर्शन करण्यास बंदी आणली होती.

Watermelon Symbol Of Palestine Movement
Watermelon Symbol Of Palestine Movement

गाझापासून लंडनच्या रस्त्यावर पॅलेस्टाईन समर्थकलोक कलिंगडचे फोटो व बॅनर घेऊन फिरताना दिसत आहेत. याचे कारण काय आहे? तसेच या आंदोलनाचे कलिंगडाशी काय आहे कनेक्शन? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.पॅलेस्टाईनला समर्थन व इस्त्रायलच्या विरोधाचेप्रतीककलिंगड बनले आहे. यामुळे संपूर्ण जगात पॅलेस्टाईन समर्थक याचे फोटो घेऊन फिरताना दिसत आहेत. या फळाची पॅलेस्टाईनच्या विरोधाचे प्रतीक बनल्याची कहाणी जवळपास ५५ वर्षे जुनी आहे.

१९६७ मध्ये इस्त्रायल आणि आखाती देशांमध्ये भीषण संघर्ष उफाळला होता. त्यावेळी इस्त्रायलने गाझा व वेस्ट बँकेत पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन प्रदर्शन करण्यास बंदी आणली होती.इतकेच नाही तर १९८० मध्ये रामल्लाहमध्ये इस्त्रायलच्या लष्कराने एक गॅलरी बंद केली होती. जे तीन आर्टिस्ट चालवत होते. या लोकांवर आरोप होता की, हे राजकीय गोष्टी दाखवत आहेत आणि त्या पॅलेस्टाईन च्या ध्वजाच्या रंगात दाखवत आहेत. हे रंग आहेत, लाल, हिरवा, काळा व पांढरा.

या तीन जणांना इस्त्रायलच्या लष्कराने बोलावले होते. या गॅलरीचे संचालन करणाऱ्या स्लिमॅन मंसूर यांना सांगितले की, इस्त्रायली पोलिसांनी त्यांना सांगितले होते की, त्यांच्या परवानगीशिवाय या गॅलरीचे प्रदर्शन भरवणे बेकायदेशीर आहे.पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगात कोणतीही वस्तू रंगवू नये. आर्टिस्टचे म्हणणे आहे की, इस्त्रायली अधिकाऱ्यांनी त्यावेळी कलिंगडाकडे बोट दाखवून म्हटले की, याचे प्रदर्शनही लष्कराच्या नियमांचे उल्लंघन आहे. कारण जेव्हा टरबूज कापले जाते तेव्हा त्याचे रंग पॅलेस्टाईन ध्वजाशी मिळते-जुळते असतात.

इस्त्रालयी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार कापलेले कलिंगड पॅलेस्टाईन समर्थनाचे प्रतीक बनले आहे. येरूशलम येथे जन्मलेले लेखक महदी सब्बाग म्हणतात की, मी कोठेही जेव्हा कापलेले टरबूज पाहतो तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक समजून घेतो. त्यांनी म्हटले की, इस्त्रायली परिसरातही लोक याचे प्रदर्शन करतात व लष्कर त्यांना अटक करत असते.

मंसूर म्हणतात की, १९९० मध्येही कापलेले टरबूज घेऊन खूप प्रदर्शन होत होते. आता पुन्हा एकदा हे पॅलेस्टाईनचे राष्ट्रीय प्रतीक बनले आहे. एक वर्षापूर्वी इस्त्रायलने सार्वजनिक ठिकाणी पॅलेस्टाईनच्या ध्वजाच्या प्रदर्शनास बंदी आणली होती. याचा खूप विरोध झाला होता.तेव्हा जाजिम संघटनेने तेल अवीव येथे टॅक्सीवर टरबूजाचे स्टीकर लावले होते. त्याखाली कॅप्शन दिले होते की, 'हापॅलेस्टाईनचा ध्वज नाही'. अशा प्रकारे टरबूज पॅलेस्टाईनच्या समर्थनाचे एक प्रतीक बनत गेला.

Whats_app_banner
विभाग