gobi manchurian ban in Goa : गोव्यात कोबीच्या मंचुरीयनवर बंदी! काय आहे कारण? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  gobi manchurian ban in Goa : गोव्यात कोबीच्या मंचुरीयनवर बंदी! काय आहे कारण? वाचा

gobi manchurian ban in Goa : गोव्यात कोबीच्या मंचुरीयनवर बंदी! काय आहे कारण? वाचा

Feb 05, 2024 09:16 AM IST

gobi manchurian ban in Goa : गोव्यात चायनीज पदार्थांपैकी पेमस असलेल्या कोबीच्या मंचूरीयनवर बंदी घालण्यात आली आहे.

gobi manchurian
gobi manchurian

gobi manchurian ban in Goa : चायनीज पदार्थांमध्ये कोबी मंचूरीयन सर्वांचा आवडता पदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी अनेक फूड स्टॉलवर रांगा लागल्या असतात. मात्र, याच कोबी मंचूरीयनवरुन गोव्यात गदारोळ सुरू आहे. म्हापसा येथे या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. यामागे स्वच्छतेपासून सिंथेटिक रंगांचा वापर करण्यापर्यंत अनेक कारणे असू शकतात अशी माहिती आहे. या पूर्वीही कोबी मंचुरियनवर गोव्यात बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra Weather update: राज्यात पावसासह थंडीचा कडाका वाढणार! पुढील काही दिवस असे असेल हवामान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोव्यातील मापुसा येथील स्टॉल्स आणि कार्यक्रमांमध्ये कोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे. नगरसेवक तारक आरोलकर यांनी गेल्या महिन्यात मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान कोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली होती. या डिश बंदीला अनेकांनी पाठिंबा दिला.

Vasai Crime news : धक्कादायक! वसईत गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू

२०२२मध्ये येथील श्री दामोदर मंदिराच्या वास्को सप्ताह मेळाव्यातही एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाने मुरगाव महानगरपालिकेला कोबी मंचुरियनची विक्री बंद करण्यास सांगितले होते. स्वच्छतेच्या मुद्द्यावरून गोव्यातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये उभारलेल्या स्टॉलवर एफडीएने छापे टाकले होते.

एमएमसीच्या चेअरपर्सन प्रिया मिशाल या बाबत म्हणाल्या, 'कौंसिलर्सचे मत होते की विक्रेते स्टॉलवर स्वच्छता ठेवत नाही. तसेच गोबी मंचुरियन बनवण्यासाठी सिंथेटिक रंग मोठ्या प्रमाणात वापरतात. या कारणामुळे या डिशवर बंदी घालण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, स्टॉलची परवानगी घेण्यासाठी आलेल्या विक्रेत्यांना गोबी मंचुरियन विकण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय गोबी मंचुरियनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर