बेंगळुरुमधील कब्बन पार्कमध्ये झाडांना मिठ्ठी मारण्यासाठी १५०० रुपये वसुली केल्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ट्रोव एक्सपीरियन्स नावाच्या कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर "फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियन्स" सुरू केला आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की, वनांमध्ये हीलिंग शक्ती आहे. बेंगळुरुमधील कंपनीने याबाबत एक जाहिरात दिली आहे.
जाहिरातीत म्हटले आहे की, “फॉरेस्ट बाथिंग” ची तिकीट दीड हजार रुपयात बुक केली जाऊ शकते. कंपनीची ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक ही जाहिरात बनावट असल्याचे म्हणत आहेत तर काही लोक याला प्राचीन परंपरेपासून पैसे वसुली करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे म्हणत आहेत.
वेबसाइटवर सांगण्यात आले आहे की,"फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियन्स" मध्ये झाडांना मिठ्ठी मारण्याबरोबरच अनेक क्रियांचा समावेश आहे. व्हायरल स्क्रीनशॉटनुसार २८ एप्रिल रोजी होणाऱ्या या खास इव्हेंटसाठी तिकीटे विकली जात आहेत. याबाबत एका एक्स यूजरने एक स्क्रीन शॉट शेअर केला करत याला मोठा घोटाळा म्हटले आहे. व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की,"बेब, जागो! बाजारात नवीन घोटाला आला आहे.
दरम्यान ट्रोव एक्सपीरियन्स कंपनीच्या वेबसाइटवर या उपक्रमाबाबत लिहिले आहे. "शहरात आपले दोनंदिन जीवन खूपच तणावपूर्ण असू शकते. निसर्गाशी जोडण्यासाठी एक समर्पित वेळ व ठिकाण शोधणे, आपली आवाज ऐकण्यासाठी सर्व कोलाहलापासून मुक्त होणे खूपच आव्हानात्मक असते. शिन्रिन योकू, किंवा वन स्नानाची जपानी कला, जंगलात एक गहन,मौन आणि भावनिक सैर घडवते. येथे मनाला शांती मिळते. फॉरेस्ट बाथिंग एक जपानी परंपरा “शिनरिन-योकू” आहे. यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विश्रांती घेतली जाते.
आता सोशल मीडियावर कंपनीची एक जाहिरात व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स कंपनीवर टीका करत आहेत. काही यूजर्सने याकडे लक्ष वेधले आहे की, बेंगळुरुमधील कब्बन पार्क जंगल नाही तसेच यामध्ये प्रवेश बिल्कूल मोफत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, कब्बन पार्कमधील गवताला हात लावणे अजून तरी मोफत आहे.
संबंधित बातम्या