मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New parliament: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी २८ मे हीच तारीख का निवडली गेली? 'हे' आहे कारण

New parliament: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी २८ मे हीच तारीख का निवडली गेली? 'हे' आहे कारण

May 26, 2023 05:17 PM IST

New parliament building inauguration: संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

New Parliament
New Parliament

New Parliament Building Inauguration On 28 May 2023: नवीन संसद भवन उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे यासाठी लोकसभा सचिवालय आणि केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर स्वतःहून सुनावणी करण्यास नकार दिला. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे २०२३ ला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतील, हे जवळपास स्पष्ट झालंय. परंतु, नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी २८ मे हिच तारीख का निवडली गेली? यामागचे कारण जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

मोदी सरकारला सत्तेत येऊन २६ मे २०२३ ला नऊ वर्ष पूर्ण झाली. याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी (२६ मे २०१४) नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ ला दुसऱ्यांना शपथ घेतली. मग नवीन संसद भवनाच्या उद्घटनासाठी २८ मे तारीख का निवडण्यात आली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेच्या नव्या इमारतीचे २८ मे २०२३ रोजी उद्घाटन करतील. याच दिवशी भारताचा वीर सुपुत्र विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती आहे. वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी भगुर येथे झाला. संसदेची नवी इमारत ही पुढील १५० वर्षे डौलाने उभी राहील. सध्या असलेल्या इमारतीला बांधून १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये एकावेळी ८८८ खासदार लोकसभा सभागृहात बसू शकतात. तर, राज्यसभा सभागृहात ३०० खासदार एकत्र बसू शकतात. दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घ्यायची ठरल्यास १ हजार २८० खासदार एकत्र बसू शकतील.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग