Google Trends : 'पासपोर्ट सेवा' हा शब्द का होतोय गुगलवर ट्रेंड? जाणून घ्या त्यामागचे कारण-why passport seva is trending on google search ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google Trends : 'पासपोर्ट सेवा' हा शब्द का होतोय गुगलवर ट्रेंड? जाणून घ्या त्यामागचे कारण

Google Trends : 'पासपोर्ट सेवा' हा शब्द का होतोय गुगलवर ट्रेंड? जाणून घ्या त्यामागचे कारण

Sep 04, 2024 08:25 PM IST

Passport Seva : गुगलवर पासपोर्ट सेवा हा शब्द अवघ्या चार तासांत २० हजाराहून अधिक वेळा सर्च करण्यात आला.

गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या टॉपिकमध्ये पासवर्ड सेवा शब्दांचा समावेश
गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या टॉपिकमध्ये पासवर्ड सेवा शब्दांचा समावेश

Passport Seva Trending On Google: गुगलवर मंगळवारी सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या टॉपिकमध्ये 'पासपोर्ट सेवा' या शब्दाचा समावेश होता. हा शब्द अवघ्या चार तासांत २० हजाराहून अधिक वेळा सर्च करण्यात आला. पासपोर्ट हा शब्द गुगलवर ट्रेन्ड का होतोय? त्यामागचे कारण जाणून घेऊयात.

तांत्रिक देखभालीमुळे ऑनलाईन पासपोर्ट सेवा पोर्टल २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर सकाळी ०६.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत हे पोर्टल नागरिकांसह परराष्ट्र मंत्रालय, आरपीओ, बीओआय, आयएसपी, डीओपी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळेपूर्वी पासपोर्ट सेवा पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ०१ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून ऑनलाईन पासपोर्ट सेवा सुरू करण्यात आली.

मात्र, गेल्या दोन- तीन दिवसांपासून लोकांना भारतात पासपोर्ट सेवा घेता येत नव्हती. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.आता पासपोर्ट सेवा ऑनलाईन झाली आहे. नागरिक पूर्वीप्रमाणेच पासपोर्ट सेवा पोर्टलला भेट देऊन सर्व सुविधांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकतात. यामुळेच पासपोर्ट सेवा हा शब्द गुगलवर ट्रेंड करत होता. अवघ्या ४ तासांत २० हजाराहून अधिक वेळा पासपोर्ट सेवा हा शब्द गुगलवर सर्च करण्यात आला.

पासपोर्ट सेवांसाठी अर्जदार सरकारची अधिकृत वेबसाईट www.passportindia.gov.in वर भेट देऊ शकतात. याशिवाय, अर्जदार अधिकृत mPassport अॅप डाऊनलोड करून अर्ज करू शकतात, हे अॅप Android आणि iOS ॲप स्टोअर्सवर उपलब्ध आहे. अर्जदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.

विभाग