Why Nepal Faces Earthquake Frequently : नेपाल-तिबेटच्या सीमावर्ती भागात मंगळवारी सकाळी ७.१ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. या विनाशकारी भूकंपानंतर तिबेटमध्ये काही तासात १५० आफ्टर शॉक जाणवले गेले. या भूकंपाने तिबेटमध्ये १००० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून मृतांचा आकडा १२६ वर पोहोचला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू आशियायी आणि इंडो-ऑस्ट्रेलियाई प्लेटांच्या परिसरात होता. या भागात विनाशकारी भूकंप येण्याचे प्रमुख कारण म्हणजे या दोन प्लेटांचे एकमेकांवर आदळणे आहे. हे काही पहिल्यादांच झाले नाही की, नेपाल व परिसरात मोठा भूंकप झाला आहे. येथे लहान मोठे भूकंपाचे धक्के नियमितपणे जाणवत असतात.
तुम्ही कधी विचार केला आहे का, की नेपाळमध्ये सर्वाधिक भूकंप का येतात. मात्र याची भौगोलिक माहितीत सर्वांनी शालेय जीवनात अवश्य वाचले असेल, मात्र कधी लक्ष दिले नाही की, नेपाळमध्ये भूंकप नियमितपणे कसे होतात.
नेपाळ जगातील सर्वाधिक भूकंप प्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. येथे नियमितपणे भूकंपाचे धक्के जाणवत असतात. याचे कारण जमिनीच्या खाली १३० ते १९० किलोमीटर खोलीवर असलेली टेक्टोनिक प्लेट्स आहेत. पृथ्वीचा भूभाग अनेक टेक्टोनिक प्लेट्सपासून बनला आहे. या प्लेटांवरच समुद्र आणि मोठमोठे पर्वत आहेत. या प्लेट सतत हालचाल करत असतात व एकमेकांवर आदळत असतात.
नेपाळ मोठ मोठ्या टेक्टोनिक प्लेट (आशियायी आणि इंडो-ऑस्ट्रेलियाई प्लेट) च्या सीमेवर आहे. या दोन प्लेटा एकमेकांवर आदळल्य़ाने हिमालय पर्वताची निर्मिती झाली आगेय जेव्हा दोन प्लेटांची धडक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या प्लेट एकमेकांवर आदळत असल्याने हिमालयाची उंची सतत वाढत आहे.
प्रत्येक वर्षी इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट आशियायी प्लेटच्या खाली जवळपास चार ते पाच सेटींमीटर खचत आहे. भलेही ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात नाही मात्र यामुळे अधिक ऊर्जा निर्माण होते व परिसरात विनाशकारी भूकंप येत असतात.
पृथ्वीचे तीन मुख्य थर आहेत. ते म्हणजे, क्रस्ट, मेंटल आणि कोर. क्रस्ट सर्वात वरचा थर आहे. त्यानंतर मेंटल आणि कोर थर आहे. क्रस्ट दोन थरांच्या तुलनेत खूपच पातळ थर आहे. महासागराच्या खाली असलेल्या क्रस्टची रुंदी सामान्यपणे केवळ ५ किलोमीटर असते. हा थर बेसॉल्ट खडकापासून बनला आहे. दरम्यान खंडांच्या खालील असलेला थर जवळपास ३० किलोमीटर असतो. मोठ्या पर्वत रांगांमध्ये हा थर १०० किलोमीटर खोलीपर्यंत असतो.
टेक्टोनिक प्लेट्स पृथ्वीचे क्रस्ट आणि वरच्या मेंटलला बनवणाऱ्या दगडांची मोठी व अनियमित आकाराचे स्लॅब आहेत. हे प्लेट एकमेकांवर आदळतात व पर्वतांची निर्मिती होते. या प्रक्रियेतून निर्माण झालेला हिमालय पर्वत हा एक तरुण पर्वत आहे जो भूवैज्ञानिक दृष्टीकोनातून खूपच अस्थिर आहे. असे म्हटले जाते की येथील खडक देखील खूप कमकुवत आहेत, ज्यामुळे भूकंपाचा प्रभाव आणखी वाढतो. याशिवाय मातीची धूप आणि पावसामुळे जमीन सरकते आणि ही घटना अधिक गंभीर बनते.
संबंधित बातम्या