मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. हायकोर्टात अचानक घुसला व्यक्ती अन् न्यायाधीशांसमोर स्वत:चा गळा चिरला

धक्कादायक.. हायकोर्टात अचानक घुसला व्यक्ती अन् न्यायाधीशांसमोर स्वत:चा गळा चिरला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 03, 2024 11:27 PM IST

Karnataka High Court : एका व्यक्तीने उच्च न्यायालयात घुसून न्यायाधीशांसमोरच स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने असे का केले हे अद्याप समोर आलेले नाही.

न्यायालयात घुसून आत्महत्येचा प्रयत्न
न्यायालयात घुसून आत्महत्येचा प्रयत्न

कर्नाटक हायकोर्टमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने हायकोर्टाच्या आतमध्ये कोर्ट हॉल एकमध्ये मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांच्यासमोरच चाकूने आपला गळा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूर येथे राहणाऱ्या श्रीनिवास यांनी कोर्ट हॉल वनच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे एक फाइल सोपवली व कोणाला काही समजण्यापूर्वी त्यांनी मुख्य न्यायाधीश अंजारिया यांच्या समोरच आपला गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालय परिसरात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीकडे धाव घेत त्यांच्या हातातून चाकू हिसकावून घेतला व जखमी अवस्थेत त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी सांगितले की, श्रीनिवास यांनी टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समजलेली नाही. तो न्यायालयाच्या हॉल नंबर एकमध्ये पोहोचला व त्याने आपल्याजवळ असलेल्या चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. तेथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले व तत्काळ त्याला रुग्णालयात हलवून त्याचा जीव वाचवला. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.

मुख्य न्यायाधीश अंजारिया यांनी उच्च न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणावर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले की, एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन न्यायालयाच्या आतमध्ये कसा काय येऊ शकतो. त्यांनी पोलिसांना आदेश दिला आहे की, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे व जबाबाच्या नोंदी ठेवाव्यात. श्रीनिवास यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जी फाईल दिली होती, त्यातील कंटेंट अजून समोर आला नाही. न्यायालयाने म्हटले की, ते कागदपत्रांची चौकशी करेल कारण हे कागदपत्रे कोणत्या प्रसिद्ध वकीलाने न्यायालयात सादर केलेली नव्हती.

उच्च न्यायालयाने म्हटले की, अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाविना कोणतेही कागदपत्र मिळवू नये. पोलीस अजूनही चौकशी करत आहे की, त्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला. पोलीस डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्याची साक्ष नोंदवण्याची प्रतिक्षा करत आहेत.

हॉटेलमध्ये पती-पत्नीसह मैत्रिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

अरुणाचल प्रदेशातील एका हॉटेलमध्ये केरळमधील पती, पत्नी आणि त्यांच्या मैत्रिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांचे मनगट ब्लेडच्या साह्याने कापण्यात आले होते. तर पुरुषाचा मृतदेह हा बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे हत्याकांड 'काळ्या जादू'तून झाले असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

WhatsApp channel

विभाग