मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपली दोन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांच्या मुलासह विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून दोन्ही निष्पापांचा मृत्यू झाला. महिलेचा जीव वाचला आहे. खरं तर ही महिला पतीच्या वाईट सवयी व दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होती. पतीच्या दारू पिण्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. ही घटना राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भभुआ गावातील आहे.
रामकली पाल असे या महिलेचे नाव आहे. पती अनिल पाल याला दारूचे व्यसन असून यावून त्यांच्यात वाद झाला होता. अनिलला दारू पिऊन जुगार खेळण्याची घाणेरडी सवय आहे. रामकलीने नकार दिल्यावर तो अनेकदा तिला मारहाण करायचा. रामकली ने सांगितले की, तो रोज म्हणायचा की तू मुलांसोबत कुठेतरी जाऊन मर.
पतीची मारहाण व टोमणे ऐकून रामकलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या दोन लहान मुलांना घेऊन घराजवळील विहिरीत उडी मारली. या दोन्ही निष्पापांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील लोक या संपूर्ण घटनेला दारूशी जोडून पाहत आहेत. अनिलने दारू प्यायली नसती तर कदाचित आज त्याची दोन्ही मुलं जिवंत असती, असं गावकरी म्हणत आहेत.
गावातील लोकांनी सांगितले की, अनिलला दारूपिण्याचे व्यसन आहे. अनेकवेळा दारूच्या नशेत त्याने पत्नीला मारहाण केली आहे. त्याची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. हळूहळू अनिलला जुगाराचीही सवय लागली. जुगाराच्या व्यसनाच्या आहारी अनिलने अनेकदा मोठी रक्कम गमावली होती. त्याने अनेकांकडून पैसेही उधार घेतले आहेत. त्यामुळे रामकली प्रचंड अस्वस्थ झाली होती. त्यामुळेच तिने आपलं आणि मुलांचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सध्या आपल्या घरी आहे. आपला जीव वाचला याचे तिला प्रचंड दु:ख आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. किरकोळ वादातून रामकलीने असे काम का केले, याचे गावातील लोकांना आश्चर्य वाटत आहे.
संबंधित बातम्या