Mayday Mayday: विमान क्रॅश होण्याआधी मेडे- मेडे असे का ओरडतात पायलेट? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mayday Mayday: विमान क्रॅश होण्याआधी मेडे- मेडे असे का ओरडतात पायलेट? वाचा

Mayday Mayday: विमान क्रॅश होण्याआधी मेडे- मेडे असे का ओरडतात पायलेट? वाचा

Dec 31, 2024 09:01 PM IST

Plane Crashes: दक्षिण कोरिया आणि त्यानंतर काहीच तासात कॅनडात विमानाला अपघात घडला. या घटनेत १५० हून अधिक लोकांचा मृ्त्यू झाला आहे.

विमान क्रॅश होण्याआधी मेडे- मेडे असे का ओरडतात पायलेट? वाचा
विमान क्रॅश होण्याआधी मेडे- मेडे असे का ओरडतात पायलेट? वाचा

General Knowledge: दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी विमान लँडिंग करताना कोसळले, त्यात दोन वगळता जवळपास सर्वांचा मृत्यू झाला. फ्रंट लँडिंग गिअर तैनात करण्यात अपयश आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेला काही तास उलटले तोच कॅनडातही विमानाला अपघात घडला. या दोन्ही घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली. विमान दुर्घटनेआधी पायलट मेडे- मेडे असे का ओरडतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्यामागचे उत्तर जाणून घेऊयात.

विमाने आणि विमान कंपन्यांची स्वतःची एक भाषा असते, ज्याला आपण त्यांचे कोडवर्ड असे म्हणतो. हे शब्द वैमानिकांसह विमान कंपन्यांचे लोक एकमेकांना कोड शब्दांमध्ये माहिती देण्यासाठी वापरतात. यापैकी काही शब्द खूप सोपे वाटतात. परंतु, प्रत्यक्षात ते आपत्कालीन परिस्थितीत क्रू सदस्यांना सतर्क करण्यासाठी आहेत. या शब्दांमध्ये मेडे मेडे हा शब्द देखील आहे. पण तुम्हाला माहित आहे का? मेडे मेडे या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि पायलट कधी आणि कोणत्या परिस्थितीत या शब्दाचा वापर करतात? त्याबद्दल जाणून घेऊयात.

आपत्कालीन परिस्थितीत पायलट मेडे हा शब्द वापरतात.आपत्कालीन परिस्थितीत पायलट 'मेडे' हा शब्द तीन वेळा उच्चारतात. हा शब्द ऐकल्यानंतर क्रू मेंबर्स सतर्क होतात. पायलट हा शब्द नेहमी वापरत नाही. कारण शब्द फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी आहे. पण त्याऐवजी पायलट इमर्जन्सी हा शब्द का वापरत नाहीत? असा अनेकांन प्रश्न पडला असेल. खरे तर विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल समजल्यास ते घाबरतील.त्यामुळे वैमानिक कोड शब्द वापरतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की 'मेडे' हा शब्द डिस्ट्रेस कॉलमध्ये वापरला जातो. याचा अर्थ विमान आणि प्रवाशांचा जीव धोक्यात असून आपत्कालीन मदतीची गरज आहे. आणीबाणीच्या काळात, रेडिओ हस्तक्षेप आणि मोठ्या आवाजामुळे वैमानिकांना हा शब्द तीन वेळा पुन्हा सांगण्यास सांगितले जाते. 'मेडे' हा शब्द १९२० मध् पहिल्यांचा उच्चारण्यात आला. त्या काळात, लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनले मॉकफोर्ड यांनी प्रथम त्याचा वापर केला. त्यांनी फ्रेंच शब्द 'm'aider' वापरून 'Mayday' हा शब्द तयार केला. 'M'aider' म्हणजे फ्रेंचमध्ये 'मला मदत करा' असा होतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर