गाडीच्या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगांचा का असतात, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गाडीच्या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगांचा का असतात, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

गाडीच्या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगांचा का असतात, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

Jan 14, 2025 05:18 PM IST

Do You Know: आपण अनेकदा पाहिलं असेल की गाड्यांना वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट लावलेली दिसते.पण गाड्यांना अशा वेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का दिल्या जातात, याची क्वचितच लोकांना माहिती असेल.

गाडीच्या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगांचा का असतात? वाचा
गाडीच्या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगांचा का असतात? वाचा

General Knowledge:a आजकाल प्रत्येक घराच्यासमोर एखादी तरी दुचाकी किंवा चारचाकी गाडी उभी असते. तसेच आजूबाजूला रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या दिसतात. यातील बहुतांश गाड्यांच्या नंबर प्लेटचा रंग हा पांढरा किंवा पिवळा असतो. पण भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात, यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश आहे. या सर्व रंगीत नंबर प्लेटचे असण्यामागे एक विशेष कारण लपलेले आहे.

वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेटचा अर्थ

पांढरा रंग: भारतात आपल्याला ठिकठिकाणी पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या कार दिसतात. पांढऱ्या रंगाच्या कार या सामान्य भारतीय नागरिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात.

काळा रंग: काळ्या रंगाच्या कार या भाडेतत्त्वावर असणाऱ्या कार असतात.

हिरवा रंग: हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक आहे. त्यामुळे ज्या गाड्या या निसर्गपुरक असतात आणि प्रदुषण करत नाहीत अशा गाड्यांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते. आता इलेक्ट्रिक वाहनांना हिरव्या रंगाची प्लेट दिली जाते.

पिवळा रंग: एखाद्या वाहनाची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असेल तर ती गाडी कमर्शियल असते. अर्थात ही गाडी व्यावसायिक कामासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, रिक्षा किंवा टॅक्सी या गाड्यांना पिपळ्या रंगाची नंबर प्लेट असते.

निळा रंग: निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या कार या फॉरेन कार असतात.

लाल रंग: लाल रंगाची नंबर प्लेट टेम्परोरी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असतात. यांचा वापर काही महिन्यांसाठी केला जातो.

लाल रंग आणि त्यावर भारताचा अशोक स्तंभ: देशातील महत्वाचे मंत्री व भारत सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते.

नंबर प्लेट आणि वरच्या दिशेने अ‍ॅरो असणाऱ्या कार: या कारची नंबर प्लेट असणाऱ्या कार या मिलिटरीच्या वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात. याचा वापर सामान्य नागरिकांना करता येत नाही.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी करा अर्ज

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत वेगवेगळ्या राज्यांमध्ये थोडी वेगळी असू शकते. परंतु, मुख्य प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे. भारतात लर्नर लायसन्स, पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट असे चार प्रकारचे लायसन्स आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.

अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

-  सर्वप्रथम परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://parivahan.gov.in/parivahan/ येथे भेट द्या.

- त्यानंतर ड्रायव्हर/लर्नर लायसन्स सेक्शनमध्ये जाऊन 'More' पर्यायावर टॅप करा.

- राज्य निवडा आणि 'अप्लाई फॉर लर्नर लायसन्स'वर क्लिक करा किंवा टॅप करा.

- स्क्रीनवरील सूचना वाचल्यानंतर 'कंटिन्यू' वर क्लिक करा.

- आधार कार्डच्या मदतीने सहज अर्ज करण्यासाठी 'सबमिट व्हाया आधार ऑथेंटिकेशन'वर टॅप करा.

- आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी टाका.

- स्क्रीनवर विचारलेला ईमेल आयडी आणि फोन नंबर सारखी माहिती प्रविष्ट करा आणि पिवळ्या सेल्फ डिक्लेरेशन (फॉर्म 1) बटणावर टॅप केल्यानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्या.

- आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर