Budget 2025 : १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सवलत केवळ ७ लाख उत्पन्न असलेल्या लोकांपुरती मर्यादित होती. या निर्णयावर अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, दरमहा एक लाख रुपये कमावणाऱ्या लोकांवरील कराचा बोजा कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे आम्ही प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ७ लाखांवरून १२ लाख रुपये केली आहे.
सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सर्व उत्पन्न स्तरातील करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करातून सूट देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांवर कर आकारला जाऊ नये, असे सरकारचे मत आहे. आमचे सरकार यावर सातत्याने काम करत आहे.
करदात्यांनी बचत किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून वाचवलेला पैसा परत आणणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आम्ही निर्णय घेतला आहे की काही लोकांना केवळ स्लॅब दर कपातीव्यतिरिक्त अतिरिक्त लाभ मिळावेत. या निर्णयामुळे करदात्यांनी वाचवलेला पैसा उपभोग, बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत परत येईल, अशी आम्हाला आशा आहे.
अर्थमंत्र्यांनी आधीच्या यूपीए सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, करदात्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. आम्ही स्लॅब दर कमी करण्याव्यतिरिक्त इतर फायदे देण्याच्या योजनेवर काम करत आहोत. आजच्या तुलनेत २०१४ च्या काँग्रेस सरकारचे निर्णय पाहिले तर तुम्हाला ही गोष्ट समजेल. जनतेच्या हातात पैसा देणे हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट राहिले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात आठ लाख रुपये कमावणाऱ्यांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर भरावा लागत होता. तर १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना जवळपास २ लाख रुपये कर भरावा लागत होता, जो आता शून्य झाला आहे. म्हणजेच आता त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची बचत झाली आहे.
सीतारामन म्हणाल्या की, सरकार सर्व पातळ्यांवर दर कमी करत आहे. म्हणजेच २०१४ मध्ये २४ लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला ५.६ लाख रुपये कर भरावा लागत होता, आता त्याला फक्त ३ लाख रुपये कर भरावा लागणार आहे. त्यामुळे त्याच्या हातातील २.६ लाख रुपयांची ही बचत होणार आहे.
संबंधित बातम्या