शंभर वर्ष आयुष्य जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम्मी कार्टर यांना का आवडायचे शेंगदाणे? वाचा...
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शंभर वर्ष आयुष्य जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम्मी कार्टर यांना का आवडायचे शेंगदाणे? वाचा...

शंभर वर्ष आयुष्य जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम्मी कार्टर यांना का आवडायचे शेंगदाणे? वाचा...

Jan 05, 2025 08:15 AM IST

Jimmy Carter News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. ते अमेरिकेचे सर्वात जास्त काळ जगणारे राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शंभर वर्ष आयुष्य जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम्मी कार्टर यांना का आवडायचे शेंगदाणे? वाचा...
शंभर वर्ष आयुष्य जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम्मी कार्टर यांना का आवडायचे शेंगदाणे? वाचा...

Jimmy Carter News : अमेरिकेचे ३९  वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं वयाच्या १००  व्या वर्षी निधन झालं. ते आजारी असल्याने त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांची पत्नी रोझलिन यांचे निधन झालं होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कार्टर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत जगाने एक महान नेता गमावला असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या महान नेत्याला शेंगदाणे खायला आवडायचे. त्या मागची गोष्ट देखील मजेशीर आहे. कार्टर हे त्यांच्या कार्यालयात शेंगदाण्याने भरलेल्या पिशव्या देखील ठेवत असत.  कार्टर हे शेंगदाणा उत्पादक शेतकरी म्हणून अमेरिकेत प्रसिद्ध होते. 

जिमी कार्टर यांचा जन्म १९२४ मध्ये एका शेतकऱ्याच्या घरात झाला. १९६० मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९४६ मध्ये त्यांचे लग्न झाले. सुरुवातीला ते नौदलात होते पण नंतर ते राजकारणाकडे वळले. कार्टर यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. १९७१ मध्ये ते गव्हर्नर झाले आणि ६ वर्षांनी रिपब्लिकन पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.

शेंगदाणा उत्पादक शेतकरी 

तुम्हाला आश्चर्य वाटेल कार्टर यांना शेंगदाणे खाणे खूप आवडायचे. राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध शेंगदाणा उत्पादक शेतकरी होते. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात ते त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये शेंगदाण्याच्या पिशव्या ठेवत असतं. ऑक्टोबर १९७७  मध्ये, अध्यक्ष कार्टर आणि फर्स्ट त्यांच्या पत्नी रोझलिन कार्टर यांनी अगदी ‘पीनट ब्रिगेड’ पार्टीचे आयोजन केलं होतं. त्यांची ही पार्टी चांगलीच गाजली होती. राजकारणात प्रवेश करूनही, ते अतिशय नम्र होते. त्यांना शेंगदाणे खाणे आवडायाचे. या बाबत ते  नम्रपणाने कबुली देखील देत होते.  जिमी यांच्या मतानुसार,  शेंगदाणे केवळ एक चवदार नाश्ताच नाही तर अनेक आरोग्य फायद्यांनी युक्त असा आहारआहे. शेंदगदाणे  प्रथिने समृद्ध असून त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. शेंगदाणे खाण्यास पोषक असतात. व्हिटॅमिन ई, बी जीवनसत्त्वे जसे की नियासिन आणि फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस). शेंगदाण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात, अशी त्यांची भावना होती.  

विनोदबुद्धी

जिमी कार्टर हे त्यांच्या  विनोदबुद्धीसाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांच्या या गुणाचे जगभरातील लोक त्यांचं कौतुक करत होते. अध्यक्ष पदावर असतांना रोजच्या आव्हानांचा सामना करत ते त्यांच्या विनोदबुद्धीने वातावरण हलके फुलके ठेवायचे.  हसण्यामुळे शरीरातील नैसर्गिक 'फील-गुड' रसायने एंडोर्फिन सोडण्यास चालना मिळते, असे ते म्हणायचे.  

जिमी कार्टर गेल्या काही दिवसांपासून मेलेनोमा आजाराने त्रस्त होते. हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. या आजारामुळे त्याचा मेंदू आणि यकृत खराब झाले होते. २०२३ मध्ये त्यांच्यावर  घरीच उपचार करण्यात येत होते.  डॉक्टर आणि परिचारिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतरही ते काम करत राहिले. त्यामुळे त्यांना  २००२ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर