मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  China E-jiao : चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी, ई जियाओ ठरलं कारण; काय आहे हा प्रकार?

China E-jiao : चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी, ई जियाओ ठरलं कारण; काय आहे हा प्रकार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2024 05:44 PM IST

What Is E Jiao : चीनमध्ये गाढवांच्या कातड्याची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात ई जियाओ नावाचे औषध बनवण्यासाठी अनेक शतकांपासून होत आहे.

चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी
चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी

चीनमध्ये गाढवांची मागणी दरवर्षी वाढत आहे. चीनमध्ये दरवर्षी ४० ते ६० लाख गाढवांची मागणी आहे. ही संख्या जगातील एकूण गाढवांच्या संख्येच्या १० टक्के आहे. काही वर्षापर्यंत आफ्रिकन देशातून गाढवांची कातडी चीनला पाठवली जात होती. मात्र तेथे बंदी घातल्यमुळे आता पाकिस्तान आणि अफगानिस्तानमधून निर्यात केली जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

ब्रिटनमधील स्वंयसेवी संस्था 'द डॉन्की सँक्चुअरी' द्वारे २०१६ मध्ये केल्या गेलेल्या एका अध्ययनानुसार चीनी व्यापारामुळे जगभरात एका वर्षात ४८ लाख गाढवांची कत्तल करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक संख्या आफ्रिकन देशांमधील आहे. मात्र नायजेरिया,  यूगांडा, बोत्सवाना,  तंझानिया आदि देशात २०२२ मध्ये गाढवांच्या हत्येला बंदी घातल्यामुळे त्याची भरपाई पाकिस्तान-अफगानिस्तान करत आहेत. ऑस्ट्रेलियन नॅशनल यूनिवर्सिटीमध्ये दक्षिण आशिया संशोधन संस्थेचे संचालक मुहम्मद ए. कावेश यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून चीनला पाठवली जाणारी गाढवांची कातडी गुप्त व्यापाराचा हिस्सा आहे. 

रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २०२२ मध्ये कराचीहून हांगकांगकडे निघालेल्या जहाजातून जवळपास १० मेट्रिक टन गाढवाची कातडी जप्त केली होती. या माध्यमातून गाढवाच्या कातड्याची तस्करी केली जात होती. चीनमध्ये गाढवांच्या कातड्याची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात ई जियाओ नावाचे औषध बनवण्यासाठी अनेक शतकांपासून होत आहे.

काय आहे ई जियाओ?
चीन सरकारच्या चायना डेली वृत्तपत्रानुसार ई-जिआओ एक असे औषध आहे. याचा उत्तर शेडोंग प्रांतात ३ हजार वर्षापासूनचा इतिहास आहे. हा प्रांत चीनमधील ई-जियाओ उत्पादनातील जवळपास ९० टक्के उत्पादन करते. चीनी राज्य मीडियानुसार  ई-जियाओ चीनमधील "राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा" आहे आणि पारंपरिक चीनी उपचार उद्योगात सर्वात महत्वपूर्ण उत्पादनांपैकी एक आहे. 

५०० ग्राम ई जियाओची किती किंमत?
चीनमध्ये शतकांपासून या औषधाचा वापर रक्त वाढवणे, इम्यूनिटी बूस्ट करणे तसेच सौंदर्य प्रसाधनाच्या रुपात केला जातो. याला एक सुपरफूडच्या रुपात ओळखले जाते. हे चीनमधील श्रीमंताचे आवडीचे खाद्य आहे. त्याचबरोबर याला महाड्या भेटवस्तूच्या रुपात दिले जाते. चीनी मीडियाच्या रिपोर्टनुसार मागच्या दशकात या औषधाच्या किंमतीत ३० पट वाढ झाली आहे. सध्या ५०० ग्राम ई जियाओची किंमत १०० युआन हून वाढून २९८६ युआन म्हणजे ३५,१९० रुपये झाली आहे.

चीनमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे गाढवांची संख्या - 
चीनी मीडियाच्या एक रिपोर्टनुसार चीनमध्ये १९९२ मध्ये १.१० कोटी गाढवे होती. त्यामध्ये ८० टक्के कमी येऊन आता केवळ २० लाख शिल्लक राहिली आहेत. देशात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने ई जियाओ उद्योगासाठी परदेशातून गाढवाची कातडी निर्यात करण्यास सुरुवात केली गेली. गाढवांची कातडी वाळवून त्याची निर्यात केली जाते. त्यानंतर चीनमध्ये ई-जियाओ उद्योगात त्याला उकळले जाते. त्यातून एका प्रकारचा द्रव पदार्थ बनतो. त्यातून औषध बनवले जाते. त्यानंतर कातड्याच्या अवशेषातून कँडी, केक आणि अन्य सौंदर्य प्रसादने बनवली जातात.

IPL_Entry_Point

विभाग