Delhi Election Result: भाजपचा ऐतिहासिक विजय व AAP च्या मानहानीकारक पराभवात काँग्रेसनं काय मिळवलं? आनंदाची ‘ही’ तीन कारणे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Election Result: भाजपचा ऐतिहासिक विजय व AAP च्या मानहानीकारक पराभवात काँग्रेसनं काय मिळवलं? आनंदाची ‘ही’ तीन कारणे

Delhi Election Result: भाजपचा ऐतिहासिक विजय व AAP च्या मानहानीकारक पराभवात काँग्रेसनं काय मिळवलं? आनंदाची ‘ही’ तीन कारणे

Published Feb 08, 2025 06:20 PM IST

Congress Happy on AAP Election Losses: आपच्या पराभवाने भाजप तर खूश आहे त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसही खूश आहे. खरे तर तीन मोठ्या कारणांमुळे 'आप'चा पराभव झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत आहे.

राहुल गांधी व अरविंद केजरीवाल
राहुल गांधी व अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपने ४८ जागांसह दोन तृतीयांश जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अशीच कामगिरी करत एकूण ४९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ३२ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत भाजपच्या कामगिरीची पुनरावृत्ती त्याच मार्गावर झाली आहे. दुसरीकडे विजयाची हॅटट्रिकची संधी असलेल्या आम आदमी पक्षाला सत्ता तर गमवावी लागलीच, शिवाय मानहानीकारक पराभवही सहन करावा लागला आहे. पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि संस्थापक, संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

१२ जागांवर काँग्रेसमुळे आपच्या उमेदवारांचा पराभव -

आपच्या पराभवाने भाजप तर खूश आहे त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसही खूश आहे. खरे तर तीन मोठ्या कारणांमुळे 'आप'चा पराभव झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत आहे. पहिलं कारण म्हणजे ज्या पक्षाने दिल्लीत पराभूत करून सत्ता हिसकावून घेतली होती, त्या पक्षाकडूनही सत्ता हिसकावून घेतली आहे आणि त्याला पराभूत करून सत्तेतून बाहेर काढण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. दिल्लीत अशा १२ जागा आहेत जिथे आम आदमी पक्षाला काँग्रेसमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापैकी दोन जागांवर 'आप'चे उमेदवार ४०० पेक्षा कमी मतांनी पराभूत झाले.

५ वर्षात २ टक्क्यांनी जनाधार वाढला -

काँग्रेसच्या आनंदाचं दुसरं कारण म्हणजे २०१३ नंतर पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढू लागल्याने भविष्यात काँग्रेसचा जनाधार वाढण्याची शक्यता आहे. २०१३ मध्ये काँग्रेसला २४.६ टक्के मते मिळाली होती, ती २०१५ मध्ये ९.७ टक्क्यांवर आली. २०२० मध्ये तो टक्का आणखी घसरून ४.२६ टक्क्यांवर आला, परंतु पाच वर्षांनंतर तो २.१० टक्क्यांनी वाढला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी त्यांची मतांची टक्केवारी ६.३६ टक्क्यांवर पोहोचली आहे. पाच वर्षांनंतर काँग्रेसची मतांची टक्केवारी आणखी वाढेल आणि ते पुन्हा सत्तेत येऊ शकतील, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये पुढचे सरकार स्थापन करण्याची शक्यता -

काँग्रेसच्या आनंदाचे तिसरे कारण पंजाबशी निगडित आहे, जे मोठे आहे. दिल्लीतील राजकीय जमीन गमावल्यानंतर आता पंजाबमध्ये आपला फटका बसेल, असे काँग्रेसला वाटते. कारण या पराभवामुळे पंजाबमध्ये 'आप' मधील गटबाजी तर वाढेलच, शिवाय 'आप'चे नेते आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्यही तुटेल आणि त्याचा फायदा शेवटी कॉंग्रेसलाच होईल, कारण तेथे भाजप अजूनही खूप कमकुवत आहे. शिरोमणी अकाली दल हा तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. पंजाबमध्येही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवली होती. पंजाबमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

२०२२ च्या पंजाब निवडणुकीत आपने १७७ सदस्यीय विधानसभेत ९२ जागा जिंकून भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते, तर काँग्रेस १८ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर होती. अकाली दलाला तीन, भाजपला दोन आणि बसपला एक जागा मिळाली होती. दिल्ली निवडणुकीत 'आप'च्या पराभवामुळे दोन्ही राज्यांतील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल आणि अखेरीस सातत्याने विजयाचे प्रयत्न होतील आणि दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर