दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसानंतर तिहार जेलबाहेर आले असून तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांनंतर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनीकेली आहे.त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अवधी का हवा आहे, त्यांनी जेलमधूनच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारु घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षाने तात्काळ राजीनामा न देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रविवारी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यापासून भाजपकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. यावेळी भाजपने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर (आप) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची गरज का? असा सवाल केला आहे.
कथित दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या प्रकरणी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केजरीवाल तुरुंगात असताना भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. आता भाजपने या निर्णयाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात असताना राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर त्रिवेदी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि केजरीवाल यांना बाहेर आल्यानंतर काही तरी सेटल करायचे होते का, म्हणून ते कारागृहातून राजीनामा देण्यास तयार नव्हते? असा सवाल केला.
केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, आम आदमी पक्षात फूट पडली आहे. हे हाताळण्यासाठीच केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी म्हणतात की, आम आदमी पक्षाला आपल्या नेत्यांना हाताळणे कठीण जात आहे. याच विवशतेतून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जाहीर केला आहे.