मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Anil Vij : ‘जे महिलांना पाहून विचलित होतात, त्यांनीच हिजाबवर…’, भाजप नेत्याची वादग्रस्त टिप्पणी

Anil Vij : ‘जे महिलांना पाहून विचलित होतात, त्यांनीच हिजाबवर…’, भाजप नेत्याची वादग्रस्त टिप्पणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 01:44 PM IST

Anil Vij Controversial Statement : आज सुप्रीम कोर्टात हिजाब प्रकरणात सुनावणी झाली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यानं या प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडली आहे.

Haryana HM Anil Vij Controversial Statement On Hijab
Haryana HM Anil Vij Controversial Statement On Hijab (HT)

Haryana HM Anil Vij Controversial Statement On Hijab : कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाब घालण्याच्या निर्णयावर आज सु्प्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. न्यालायलयात या प्रकरणात न्यायाधीशांनी वेगवेगळे निकाल दिल्यानंतर या खटल्याची सुनावणी विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे. परंतु आता कोर्टाच्या या निकालानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कारण आता हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी हिजाबवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भाजप नेते अनिल विज यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या लोकांचं मन महिलांना पाहून विचलित होतं, त्यांनीच हिजाबची सक्ती केली आहे. पुरुषांनी आपल्या मनाला आणखी कठोर करायची गरज होती. परंतु त्याची शिक्षा महिलांचं अंग झाकून त्यांना दिली जात आहे. हे चुकीचं असून पुरुषांनी आपलं मन कठोर करत महिलांना हिजाबपासून मुक्ती द्यायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबचं पालन व्हायलाच हवं, शैक्षणिक संकुलाबाहेर मुली हिजाब घालत असतील तर त्यावर कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु शाळा आणि महाविद्यालयांत हे चालणार नाही, असं वक्तव्य अनिल विज यांनी याआधी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भूमिका मांडली आहे.

दरम्यान कर्नाटकात शाळा व महाविद्यायांत मुलींनी घातलेल्या हिजाबवरून मोठं राजकीय वादंग पेटलं होतं. त्यानंतर कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. कर्नाटक हायकोर्टानंही सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीनंतर हे प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

WhatsApp channel