हाथरस दुर्घटनेमुळे मला अतीव दु:ख! अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही! दुर्घटनेनंतर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हाथरस दुर्घटनेमुळे मला अतीव दु:ख! अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही! दुर्घटनेनंतर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर

हाथरस दुर्घटनेमुळे मला अतीव दु:ख! अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही! दुर्घटनेनंतर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर

Jul 06, 2024 03:03 PM IST

Hathras Stampede : हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना जीव गमवावा लागला. या अपघातानंतर भोळे बाबाची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे.

हाथरस दुर्घटनेमुळे मला अतीव दु:ख! अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही! दुर्घटनेनंतर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर
हाथरस दुर्घटनेमुळे मला अतीव दु:ख! अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही! दुर्घटनेनंतर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर

Hathras Stampede : यूपीच्या हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीत १२१ नागरिकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा याची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. या घटनेप्रकरणी भोलेबाबाने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अराजकता पसरविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाऊ नये, अशी शासन व प्रशासनाकडून अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मधुकर व इतरांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अपघात झाल्यापासून भोले भोले बाबा पाहरार होता. तो सध्या मैनपुरीतील बिछवा येथील आश्रमात लपून बसल्याचा संशय पोलिसांना आहे.

नारायण हरी साकार या नावाने प्रसिद्ध असलेल्या सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. या व्हिडिओत २ जुलैच्या घटनेनंतर दु:खी असल्याचं भोले बाबांन म्हटलं आले. देव आम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. अराजकता पसरविणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे या व्हिडिओत भोले बाबाने म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबाने दावा केला आहे की, त्यांचे वकील एपी सिंग यांच्या माध्यमातून त्यांनी समिती सदस्यांना शोकग्रस्त कुटुंबीय आणि जखमींना मदत करून त्यांना आयुष्यभर मदत करण्याची विनंती केली आहे.

कुठे लपून बसला आहे भोले बाबा?

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी दुपारी साडेचार वाजेपर्यंत भोले बाबाचे लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी मिळत होते. त्याचे शेवटचे ठिकाण मैनपुरी असल्याचे आढळून आले. तेव्हापासून फोन बंद आहे. मैनपुरीतील बिछवान येथील आश्रमात बाबा लपून बसल्याचा संशय आहे. बाबांनी दिलेले स्पष्टीकरण पत्रही मैनपुरी आश्रमातून आले आहे.

हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी मधुकरला अटक

हाथरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्ली येथून अटक करण्यात आली. हाथरसचे एसपी निपुण अग्रवाल यांनी या बाबत माहिती दिली आहे. मधुकरचे वकील एपी सिंह यांनी दावा केला आहे की, त्यांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. देव प्रकाश मधुकर यांच्यावर यूपी पोलिसांनी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. अपघातानंतर फरार झालेल्या मधुकरवर हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर नारायण हा हरी साकार उर्फ ​​भोले बाबाचा मुख्य सेवक आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर