मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  National Song : राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते? या मुलीचे उत्तर ऐकल्यावर हसून हसून व्हाल लोटपोट; VIDEO Viral

National Song : राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते? या मुलीचे उत्तर ऐकल्यावर हसून हसून व्हाल लोटपोट; VIDEO Viral

Jul 02, 2024 03:15 PM IST

Whowrotenationalsong : एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्स तरुणीला विचारले होते की, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे. याचे उत्तर तिने गायक अरिजित सिंह असे दिले.

राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते? व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते? व्हिडिओ व्हायरल

national song Of India : भारताचे राष्ट्रीय गीत (national song) कोणी लिहिले होते? शाळेची पायरी चढलेला प्रत्येक व्यक्ती या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकतो. मात्र एका मुलीने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्स तरुणीला विचारले होते की, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे. याचे उत्तर तिने गायक अरिजित सिंह असे दिले. तरुणीचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत आहेत.

यावर एकाने कमेंट केली आहे की, अखेर एका देशाच्या रुपात आम्ही कुठे जात आहोत. दरम्यान एका युजरने म्हटले की, कदाचित या तरुणीला अरिजित सिंह यांनी गायलेले‘लहरो दो-लहरा दो’हे गाणेचराष्ट्रीय गीत वाटत असावे.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये एकूण ७ ते ८ मुलींना दाखवण्यात आले आहे. मात्र कोणीही या प्रश्नाचे अचून उत्तर दिले नाही. एका मुलीने तर राष्ट्रीय गीत अरिजित सिंह यांनी लिहिल्याचे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान अन्य अनेक मुली म्हणतात की, राष्ट्रीय गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. एका मुलीने तर म्हटले की, मला माहिती नाही की, राष्ट्रीय गीत काय आहे. दरम्यान दोन तरुणींनी म्हटले की, कदाचित बंगालच्या कोणत्यातरी व्यक्तीने हे लिहिले आहे. मात्र आम्हाला त्यांचे नाव आठवत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांनी रविंद्रनाथ टागोर यांचे नाव लिहिले.

राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' बंगालमधील क्रांतिकारक कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला गेला आहे. तर रविंद्रनाथ टागोर यांनी देशाचे राष्ट्रगीत (national anthem) 'जन गण मन'लिहिले होते.  मात्र या सोप्या प्रश्नाचे मुलींनी दिलेले उत्तर आश्चर्यचकीत करणारे आहे. अनेक यूजर्संनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, तरुण पिढी अखेर कुठे चालली आहे. बंकिम चंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात १८९६ मध्ये गायले गेले. या अधिवेशनाची अध्यक्षता रहमतुल्लाह सायानी यांनी केली होती.

WhatsApp channel
विभाग