छत्तीसगडमध्ये सनी लिओनीच्या नावाने गदारोळ सुरू आहे. याचे कारण म्हणजे राज्य सरकारची महतारी वंदना योजना, ज्याअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पाठवले जात आहेत. या प्रकरणावरून राजकारण तापले असून या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, सनी लिओनीच्या नावाने दरमहा पैसे घेणारी व्यक्ती सापडली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वीरेंद्र जोशी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने सनी लिओनीच्या नावाने खाते उघडले आणि चालवले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या पडताळणीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
बस्तरमधील तलूर गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी हॅरिस एस यांनी महिला व बालविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करून बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पैसे वसूल करता येतील.
या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. महतारी वंदन योजनेचे ५० टक्क्यांहून अधिक लाभार्थी बनावट असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस आपल्या कार्यकाळात जे करू शकली नाही त्यामुळे नाराज आहे, जे आता भाजप सरकार करत आहे आणि महिलांना मासिक मदत मिळत आहे.
वर्ष २०२३ मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत महतारी वंदन योजनेच्या आश्वासनाचा मोठा वाटा होता. राज्यात विष्णुदेव साई सरकार स्थापन झाल्यानंतर महतारी वंदन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आल्याने.
छत्तीसगड सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या महतारी वंदन योजनेत सनी लिओनी आणि जॉनी सिंस यांची नावे समोर आली आहेत. खरं तर ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या वर्षी मार्चपासून या योजनेची रक्कम सनी लिओनी नावाच्या महिलेच्या खात्यात दरमहा पाठवली जात आहे. या योजनेत सनी लिओनी आणि जॉनी सिन्स यांची नावे समोर आल्याने हा प्रकार छत्तीसगडसह देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.
संबंधित बातम्या