स्वीडनमधील मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या इराकी नागरिक सलवान मोमिका याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्वीडनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलवान मोमिकाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा सोडरतालजे येथील त्याच्या राहत्या घरी आढळला. सलवानने २०२३ मध्ये कुराणच्या प्रती जाळल्या होत्या. सलवानच्या कृतीने अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये संतापाची लाट उसळली आणि अशांतता निर्माण झाली होती.
सलवानने आपले आंदोलन मुस्लिमांच्या नव्हेतर इस्लाम धर्माच्या विरोधात असून कुराणमधील संदेशांपासून स्वीडनच्या जनतेचे रक्षण करायचे आहे, असा युक्तिवाद मोमिका याने न्यायालयात केला होता. स्वीडिश पोलिसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत त्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली, पण तरीही त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले.
संबंधित बातम्या