कोण होत्या काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल, ज्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; हत्याकांडाचा संपूर्ण कहाणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोण होत्या काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल, ज्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; हत्याकांडाचा संपूर्ण कहाणी

कोण होत्या काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल, ज्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; हत्याकांडाचा संपूर्ण कहाणी

Published Mar 03, 2025 03:38 PM IST

who is Himani Narwal : हिमानी सोनीपतमधील कथुरा गावची रहिवासी होत्या. सोशल मीडियावर या तरुणीने स्वत:ला रोहतक ग्रामीणमधील भारतीय युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले.

हिमानी नरवाल
हिमानी नरवाल (x/himani_narwal)

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला बसस्थानकावर शनिवारी एक सूटकेस सापडली. त्यात एका तरुणीचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पुढे गेला असता मृत महिला स्थानिक काँग्रेस नेत्या असून तिचे नाव हिमानी नरवाल असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाला यश आले आणि एका आरोपीला अटक करण्यात आली. सचिन असे आरोपीचे नाव आहे. आता या खून प्रकरणाचे गूढ उलघडत आहे. 

या कथेतील आतापर्यंत हिमानी आणि सचिन ही दोन महत्त्वाची पात्रे समोर आली असून या घटनेची कथा नातेसंबंधांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याभोवती फिरताना दिसत आहे.

कोण हत्या हिमानी नरवाल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी सोनीपतमधील कथुरा गावची रहिवासी होत्या. सोशल मीडियावर या तरुणीने स्वत:ला रोहतक ग्रामीणमधील भारतीय युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये आणि रॅलींमध्ये हरयाणाचे लोकनृत्य सादर करण्यासाठीही त्या प्रसिद्ध होत्या. काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यासोबत च्या कार्यक्रमांमध्ये त्या दिसल्याचं बोललं जातं.

हरयाणा काँग्रेसच्या नेत्यांनी नरवाल या एक सक्रिय आणि समर्पित कार्यकर्ती असल्याचे म्हटले आहे. त्या  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोड़ो' यात्रेत देखील सहभागी झाल्या होत्या. त्या कायद्याचे शिक्षण घेत होत्या आणि गेल्या दशकभरापासून पक्षाशी संबंधित होत्या.

युवक काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बीव्ही यांनी लिहिले की, "युवक काँग्रेसमध्ये असताना धाकटी बहीण हिमानी नरवाल रोहतक ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्ष होत्या, मग ती भारत जोडो यात्रा असो किंवा संघटनेचा कोणताही कार्यक्रम असो, हिमानीने प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडली. आज रोहतकमध्ये एका सूटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला, तिची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. या बातमीवर विश्वास ठेवणे अशक्य आहे.

हिमानीच्या आईचा आरोप -

नरवाल यांच्या आई सविता यांनी रोहतक मध्ये पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, अल्पावधीतच नरवाल यांच्या राजकीय उदयामुळे काही काँग्रेस नेत्यांना नरवाल यांचा हेवा वाटत होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा जतिनही होता. त्यांच्या प्रगतीचा हेवा वाटणारा पक्षातील कोणीही असू शकतो किंवा तो दुसरा कोणी असू शकतो. नरवाल यांच्या आईने सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाची अनेक वर्षांपूर्वी हत्या झाली होती आणि त्यानंतरही त्याला न्याय मिळाला नाही.

कोणी केली हत्या -

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत सचिन (३०) या आरोपीला अटक केली आहे. सचिन हा बहादूरगडचा रहिवासी आहे. कानोडी येथे त्यांचे मोबाइलचे दुकान आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांना सांगितले आहे की, सोशल मीडियावर हिमानीसोबत मैत्री केल्यानंतर त्याचे त्याच्याशी संबंध होते. त्याने सांगितले की, हिमानीने त्याला घरी बोलावले आणि संबंध बनवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या मदतीने त्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे बोलले जात आहे. हिमानीने त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतरही त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, त्यामुळे वैतागून त्याने खून केल्याचेही त्याने म्हटले आहे.

२ मार्च रोजी महापालिका निवडणुकीपूर्वी हिमानीने त्याला घरी बोलावले होते, तेथे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली होती, असा खुलासा आरोपीने केला आहे. या मागणीला कंटाळून त्याने हिमानीची हत्या केली आणि तो आपल्या दुकानात परतला. त्यानंतर तो परत आला आणि मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी सूटकेसमध्ये भरला.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर