मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  maiden pharmaceuticals: भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळं ६६ मुलांचा मृत्यू?; WHO कडून अलर्ट जारी

maiden pharmaceuticals: भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळं ६६ मुलांचा मृत्यू?; WHO कडून अलर्ट जारी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 10:53 AM IST

Indian Cough Syrup Company: औषधांमध्ये ज्या पदार्थांचा वापर केला गेला ती विषारी आणि धोकादायक ठरू शकतात. या औषधांच्या सेवनामुळे पोटात दुखणे, उलटी, मूत्रपिंडाचा आजार, डोकेदुखी इत्यादी त्रास होऊ शकता. यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

भारतातील कफ सिरप कंपनीची ४ औषधे धोकादायक, ६६ मुलांच्या मृत्यूनंतर WHOकडून अलर्ट जारी
भारतातील कफ सिरप कंपनीची ४ औषधे धोकादायक, ६६ मुलांच्या मृत्यूनंतर WHOकडून अलर्ट जारी

Indian Cough Syrup Company: जागतिक आरोग्य संघटनेने मेडन फार्मास्युटिकल्सच्या चार कफ आणि कोल्ड सिरपबाबत इशारा दिला आहे. WHO ने हा इशारा गाम्बियात झालेल्या ६६ मुलांच्या मृत्यूनंतर दिला. तसंच सावध करताना म्हटलं की, घातक औषधे इतर देशांमध्येही वितरीत केली जाऊ शकतात. जर असं झालं तर याचा जागतिक पातळीवर परिणाम दिसू शकतो.

प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीवेळी सर्व नमुन्यात प्रमाणापेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकॉल आणि एलिथीन ग्लायकॉल आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका मेडिकल प्रोडक्ट रिपोर्टमध्ये ही बाब नमूद केली आहे. WHOने दिलेल्या इशाऱ्यात असंही म्हटलं की, वादग्रस्त उत्पादन आतापर्यंत गाम्बियामध्ये आढळले होते, मात्र हे इतर देशातही वितरीत केले जाऊ शकत होते.

भारती कंपनीशी संबंधित सर्दी आणि खोकल्याचे चार सिरप हे मुत्रपिंडाच्या गंभीर दुखापती आणि ६६ मुलांच्या मृत्यूशी संबधित आहे. रिपोर्टनुसार बुधवारी या औषधांबाबत आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल इशारा जारी केला आहे. ज्या चार सिरपबाबत इशारा दिला आहे त्यात प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरपचा समावेश आहे.

औषध कंपनीने WHOला औषधांच्या सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही माहिती दिलीलेली नाही. तपासात असं समोर आलं की, या सिरपमध्ये मर्यादेपेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचा वापर केला गेला आहे. औषधांमध्ये ज्या पदार्थांचा वापर केला गेला ती विषारी आणि धोकादायक ठरू शकतात. या औषधांच्या सेवनामुळे पोटात दुखणे, उलटी, मूत्रपिंडाचा आजार, डोकेदुखी इत्यादी त्रास होऊ शकता. यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग