मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अद्भुत! १५० वर्षापूर्वी सांगितलं होतं कधी होणार अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा, कोण आहे रामनामी समुदाय?

अद्भुत! १५० वर्षापूर्वी सांगितलं होतं कधी होणार अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा, कोण आहे रामनामी समुदाय?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 21, 2024 05:31 PM IST

Ram Mandir : एका सांप्रदायाने दावा केला आहे की, १५० वर्षापूर्वीच त्यांच्या पुर्वजांनी सांगितले होते की, राम मंदिरात राम लल्लाचीप्रतिष्ठा कोणत्या तारखेला होईल.

ramnami community
ramnami community

२२ जानेवारी २०२४... शेवटी तो दिवस उजाडला ज्याची वाट राम भक्त गेल्या अनेक वर्षापासून करत होते. या दिवशीराम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठाकेली जाईल. यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण देश राममय झाला आहे. देशभरात या दिवशी उत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान एका सांप्रदायाने दावा केला आहे की, १५० वर्षापूर्वीच त्यांच्या पुर्वजांनी सांगितले होते की, राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठा कोणत्या तारखेला होईल. हासंप्रदाय छत्तीसगडमधील रामनामी समुदाय आहे जो याच दिवशी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करत आला आहे.

सक्ती जिल्ह्यातील जैजेपूर येथे सुरू असलेल्या रामनामी जत्रेत आलेल्या गुलाराम रामनामी यांनी म्हटले की, १५० वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांनी सांगितले होते की, अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा शुक्ल पक्ष एकादशी ते त्रयोदशी दरम्यान होईल. २२ जानेवारी रोजीरामलल्लाची प्रतिष्ठा अयोध्येत होत आहे. त्याची तारीख आमच्या पूर्वजांनी आधीच सांगितली होती. आमची यात्राही याच तिथीला भरवली जाते. त्याचबरोबर अद्भुत योगायोग आहे की, राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा याचवेळी होत आहे.

गुलाराम आणि त्यांच्या साथींना आनंद आहे की, त्यांच्या पूर्वजांची भविष्यवाणी आज खरी ठरली आहे. रामनामी जत्रेबाबात सांगताना खम्हरिया येथून आलेल्या मनहरण रामनामी यांनी सांगितले की, याच तिथीला जत्रेचे आयोजन केले जाते. एकवर्ष महानंदीच्या या बाजुला तर पुढल्या वर्षी महानदीच्या दुसऱ्या बाजुला ही यात्रा भरवली जाते. १५० वर्षापासून ते भजन म्हणत आहेत. सरसकेला येथून आलेला सेजबना यांनी सांगितले की, मी बालपणापासून भजन गात आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून राम नावाचे गोदंण काढले आहे. ही चौथी पिढी भजन गात आहे.

शरीरावर रामाचे मंदिर -

गुलाराम यांनी सांगितले की, जसे लोक मंदिरात देवाचा वास असल्याचे म्हणतात. तसेच आम्ही लोक मानतो की, आमच्या हृदयात रामचा निवास असतो. आम्ही शरीराच्या प्रत्येक अवयवावर रामाचे नाव लिहिले आहे. त्यामुळे आम्ही शरीराला दूषित करू शकत नाही. यामुळे मांस-मदिरेचा त्याग करतो. राम सर्व जाती-धर्माचे आहेत.

जैजेपूरमध्ये भजन सुरू आहे. रामनामी मनहरण गात आहेत. १९११ पासून याच दिवशी जत्रेचे आयोजन केले जात आहे.

WhatsApp channel

विभाग