Youtube New CEO : गुगलचे कर्मचारी ते यूट्यूबचे सीईओ; कोण आहेत नील मोहन ?, वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Youtube New CEO : गुगलचे कर्मचारी ते यूट्यूबचे सीईओ; कोण आहेत नील मोहन ?, वाचा सविस्तर

Youtube New CEO : गुगलचे कर्मचारी ते यूट्यूबचे सीईओ; कोण आहेत नील मोहन ?, वाचा सविस्तर

Updated Feb 17, 2023 12:20 PM IST

Youtube New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन हे लवकरच यूट्यूब (YouTube) चे नवे सीईओ म्हणून धुरा सांभाळणार आहे. या सोबतच ते यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून देखील जबाबदारी सांभाळणार आहेत. गुगलचे एक साधे कर्मचारी ते यूट्यूब चे सीईओ हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

नील मोहन 
नील मोहन 

Youtube New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूब (YouTube) चे नवे सीईओ असतील. ते सुसान व्होजिकी यांची जागा घेतील. सुसान व्होजिकी हे गेल्या २५ वर्षांपासून गुगलशी जोडले होते. लवकरच ते त्यांचे पद सोडणार असून त्यांच्या जागी नील मोहन हे यूट्यूबची धुरा सांभाळणार आहे.

जगातील सर्वात मोठी व्हिडिओ वेबसाईट म्हणून गेल्या मागील ९ वर्षापासून Youtube नावारूपाला आले आहे. जगभरातील टेक कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खास क्लबमध्ये आता नील मोहन यांचा देखील समावेश झाला आहे. या सोबतच भारतीय वंशांचे गूगलचे सीईओ सत्या नडेला, एडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या रांगेत देखील नील मोहन यांचा समावेश झाला आहे.

कोण आहेत नील मोहन ?

नील मोहन यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रोनिक इंजिनियरची डिग्री घेतली आहे. नील मोहन हे २००८ मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. यानंतर २०१५ मध्ये ते यूट्यूबचे चीफ प्रॉडक्ट ऑफीसर म्हणून धुरा हाती घेतली. त्यांनी यूट्यूबला भरारी देण्यास मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी यूट्यूबची UX टीम तयार केली आहे. या सोबतच मोहन यांनी यूट्यूब टीव्ही, यूट्यूब म्युझिक आणि प्रीमियम आणि शॉर्ट व्हिडिओची देखील सुरुवात केली आहे. यू ट्यूबच्या या सर्व सेवा आज लोकप्रिय झाल्या आहेत. या सोबत काही महत्वाचे उत्पादन देखील त्यांनी बाजारात आणले आहेत.

नील यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीत देखील काम केले आहे. ते स्टीच फिक्स, जिनोमिक्स आणि बायोटेक्नॉलजी कंपनी २३ andMe या कंपन्यांचे बोर्ड मेंबर देखील ते राहिले आहेत. त्यांनी DoubleClick या कंपनीत देखील सहा वर्ष काम केले आहेत. या कंपनीला गूगलने २००७ मध्ये विकत घेतले होते. यानंतर मोहन यांनी गुगलच्या व्हिडिओ जाहिरात विंगमध्ये देखील उपाध्यक्ष म्हणून आठ वर्ष काम सांभाळले आहे.

नील यांच्यापूर्वी सिलिकॉन व्हॅलीत अनेक भारतीयांनी झेंडा रोवला आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एडोबचे सीईओ शांतनु नारायण आणि आईबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा सामील आहे. त्याचबरोबर जगातील मोठ्या टेक कंपन्या सध्या भारतीय वंशाचे लोक चालवत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर