cm mohan yadav : मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना पर्याय ठरलेले मोहन यादव आहेत कोण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  cm mohan yadav : मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना पर्याय ठरलेले मोहन यादव आहेत कोण?

cm mohan yadav : मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना पर्याय ठरलेले मोहन यादव आहेत कोण?

Updated Dec 11, 2023 05:55 PM IST

Mohan Yadav Madhya Pradesh New Chief Minister : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची निवड झाली आहे. आतापर्यंत चर्चेत नसलेले हे मोहन यादव आहेत कोण?

Mohan Yadav
Mohan Yadav

Mohan Yadav : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षानं मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुठंही नसलेल्या यादव यांच्या निवडीमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळंच मोहन यादव यांच्या बाबतीत सर्वांनाच कुतूहल निर्माण झालं आहे. कोण आहेत हे मोहन यादव? कसा झाला त्यांचा राजकीय प्रवास? जाणून घेऊया…

मध्य प्रदेशमध्ये यंदा भाजप सत्तेत पुनरागमन करेल की नाही याबाबत अखेरपर्यंत शंका होती. मात्र, भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून हे राज्य पुन्हा राखलं. शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या 'लाडली बहना' सारख्या योजनांचा पक्षाला फायदा झाला असंही बोललं गेलं. त्यामुळं शिवराज यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता होती. त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे, कैलास विजयवर्गीय, नरेंद्र तोमर अशा काही नावांचीही चर्चा होती. या सगळ्या चर्चेत मोहन यादव हे नाव कुठेही नव्हतं. मात्र, त्यांनी बाजी मारली आहे.

धीरज साहू भाजपमध्ये गेले तर लगेच स्वच्छ होतील; खासदार प्रियांका चतुर्वेदींचा अमित शाहांना टोला

कौटुंबिक पार्श्वभूमी

मोहन यादव यांचा जन्म २५ मार्च १९६५ रोजी उज्जैनमध्येच झाला. सीमा यादव यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. मोहन यादव हे उच्चशिक्षित असून त्यांच्याकडं बीएससी, एलएलबी, एमए, एमबीए आणि पीएचडीसह अनेक पदव्या आहेत.

राजकीय प्रवास

मोहन यादव हे उज्जैन जिल्ह्यातील उज्जैन दक्षिण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१३ मध्ये याच जागेवरून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१८ आणि आता २०२३ मध्ये त्यांनी इथून निवडणूक जिंकली आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी १३ हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. यादव हे २०२० पासून शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. त्यांनी उच्च शिक्षण खात्याचं मंत्रिपद भूषवलं आहे.

Sharad Pawar : कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

ओबीसी नेते

मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून येतात. त्यांच्या निवडीच्या माध्यमातून मध्य प्रदेशात ५० टक्के असलेल्या ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याची खेळी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. मोहन यादव हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे.

उपमुख्यमंत्रिपदी जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला का?

मुख्यमंत्रिपदी ओबीसी नेत्याची वर्णी लावताना जातीय समतोल बिघडणार नाही याची काळजी भाजपनं घेतली आहे. त्यामुळं एससी प्रवर्गातील जगदीश देवडा आणि ब्राह्मण समाजातील राजेंद्र शुक्ला यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. यादव यांच्या प्रमाणेच हे दोन्ही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर