Kulwinder Kaur : कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? तिनं कसला राग काढला?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kulwinder Kaur : कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? तिनं कसला राग काढला?

Kulwinder Kaur : कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? तिनं कसला राग काढला?

Jun 07, 2024 10:15 AM IST

Kulwinder Kaur CISF : पस्तीस वर्षीय कुलविंदर कौर सीआयएसएफमध्ये २००९मध्ये रुजू झाली होती. ती २०२१ पासून चंदीगड विमानतळावर सुरक्षा दलासोबत काम करत आहे. ती पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील मूळ रहिवासी आहे.

कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? तिनं कसला राग काढला?
कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? तिनं कसला राग काढला?

Kangana Ranaut Slapped: कंगना रणौतने चंदीगडमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. गुरुवारी ती चंदीगड विमानतळावरून दिल्लीला जात असतांना विमानतळावर सीआयएसएफच्या कुलविंदर कौर या महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लगावल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यामुळे संतत्प झालेल्या कुलविंदर कौरने तिला मारले असल्याचे करण पुढे आले आहे.

Pune Rain update : पुण्यात कोसळधारा! रात्री पासून पावसाची तूफान बॅटिंग; अनेक रस्ते झाले जलमय! हायअलर्ट जारी

कोण आहे कुलविंदर कौर?

पस्तीस वर्षीय कुलविंदर कौर या २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाली. २०२१ पासून कुलविंदर कौर ही चंदीगड विमानतळावर सुरक्षा दलासोबत काम करत आहेत. ती पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तिचा नवराही सीआयएसएफमध्ये शिपाई आहे. दोघेही एकाच विमानतळावर तैनात असून त्यांना दोन मुलेही आहेत. तसेच, त्यांचे भाऊ शेर सिंग हे शेतकरी नेते आणि किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटक सचिव आहेत.

Viral News : पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा नाही! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आरोपातून पतीला केले दोषमुक्त

चंदिगड विमानतळावर काय झालं?

दिल्लीला पोहोचल्यानंतर कंगनाने ट्विटरवर पोस्ट करत 'पंजाबमध्ये दहशत आणि हिंसाचारात वाढ झाल्याचे म्हणत तेथे जाण्यास असुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. कंगनाने तिचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ती सुरक्षित आणि ठीक आहे. कंगनाने सांगितले की, तिला मीडिया आणि तिच्या हितचिंतकांचे खूप फोन येत आहेत. महिला कॉन्स्टेबलने तिच्या सोबत केलेल्या व्यवहाराची देखील तिने व्हीडिओत माहिती दिली.

कंगना म्हणाली, 'तिने मला झापड मारली, शिवीगाळ करायला सुरुवात केली.' "मी सुरक्षित आहे, पण मला काळजी वाटते.' पंजाबमधील वाढत्या दहशतवादाबद्दल. हा प्रश्न भविष्यात कसा हाताळणार ?

Modi Oath Swearing-In Ceremony : मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ घेणार शपथ, JDU-TDP सोबत वाटाघाटी सुरू

कुलविंदर कौरने कंगनाला का मारले ?

सोशल मीडियावर फिरत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये या घटनेनंतर संतप्त महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर लोकांशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कुलविंदर कौरने म्हटले आहे की, 'कंगनाने दिल्लीतील झालेल्या शेतकऱ्यांचा आंदोलनात आंदोलन शेतकरी हे १००-२०० रुपये घेऊन सहभागी झाले होते. त्या आंदोलनात माझी आईही सहभागी झाली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर शेतकऱ्यांच्या निषेधावर कंगना राणौतच्या भूमिकेमुळे संतप्त होत्या. ते म्हणाले की, कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफनेही या घटनेसंदर्भात 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर