उत्तर प्रदेशातील बरेली येथे ९ महिलांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कुलदीप कुमार गंगवार याचे बालपण 'त्रासदायक' होते आणि त्यामुळेच त्याच्या कथित गुन्ह्यांना हातभार लागला असावा, असा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गंगवार (३८) याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याने५ जून २०२३ रोजी पहिली हत्या केली होती. तर यावर्षी २ जुलै २०२३ रोजी नववी महिला मृतावस्थेत आढळली.
गंगवारने सहा महिलांची हत्या केल्याची कबुली दिली असून इतर तीन मृत्यूंशीही त्याचा संबंध असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बरेली जिल्ह्यातील शाही आणि शीशगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २५ किलोमीटरच्या परिघात प्रत्येक पीडितेचा मृतदेह आढळला.
गंगवार यांची आई हयात असताना गंगवार यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याच्या मनात सावत्र आई आणि सर्वसामान्य स्त्रियांबद्दल 'राग' आणि 'तिरस्कार' निर्माण झाला.
तुटलेले लग्न : आरोपीने २०१४ मध्ये लग्न केले होते. मात्र, 'घरगुती हिंसाचारा'मुळे त्यांची पत्नी निघून गेली आणि परतलीच नाही.
पीडितेचे सामान 'ट्रॉफी' म्हणून ठेवले : पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराची पुष्टी झालेली नसली तरी संशयिताकडे त्यांचे वैयक्तिक सामान - बिंदी, लिपस्टिक, ओळखपत्र - सापडले; त्याने ते 'ट्रॉफी' म्हणून घेतले.
ऊसाच्या शेतातच मृतदेह का सापडतात? गंगवारने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, ऊसाच्या शेतात १०-१५ मीटर आत मृतदेह ठेवला तर तेथे कोणी तरी मृतावस्थेत पडले आहे हे कोणालाच कळणार नाही.
'प्रोफेशनल' मारेकऱ्याप्रमाणे काम केले: पोलिसांचे म्हणणे आहे की, हत्या 'प्रोफेशनली' करण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, गंगवार यांनी पीडितांचा पाठलाग करताना दिसणार नाही याची काळजी घेतली; खून केल्यानंतर त्याने मोबाईल वापरला नाही.
पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एक वॉर रूम तयार केली होती. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील बातम्यांचे संकलन केले गेले. या मोहिमेला'ऑपरेशन तलाश' नाव दिले गेले होते. २२ पथके गठित करत २५ किलोमीटरच्या परिसरातील जवळपास १५०० CCTV चे फुटेज तपासले गेले. त्याचबरोबर ६०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले. महाराष्ट्रात सीरियल किलर बाबत एक अध्ययन केले गेले. दीड लाख मोबाइल नंबर्सचा डेटा तपासण्यात आला. बॉडी बॉर्न कॅमरे, गुप्त कॅमेरे लावून पोलिसांना तैनात करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप गंगवार नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बाकरगंज समुआ गावातील आहे. त्याचे वय जवळपास ४० वर्षे आहे. पोलीस चौकशीत समोर आले की, त्यांच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.
संबंधित बातम्या