केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.लोकसभेतअविश्वास प्रस्तावावरभाषण करताना शहा यांनी म्हटले की, विरोधक वास्तविक मुद्दे उचलत नाहीत. हा अविश्वास प्रस्ताव त्यांचे 'चरित्र' समोर आणतो. यावेळी शहा यांनी पुन्हा एकदा 'आलिया, मालिया, जमालिया'चा उल्लेख केला.अमित शहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात आलिया, मालिया, जमालिया भारतात घुसून जवानांचे शीर कापून नेत होते.
अमितशहा म्हणाले की, २००४ ते २०१४ पर्यंतयूपीए सरकार होते. त्याकाळात दहशतवादी घुसखोरी करत होते. आलिया मालिया जमालिया घुसखोरी करत होते व जवानांचे शीर कापून नेत होते. याचे उत्तर कोणीच देत नव्हते. आमच्या काळात दोन वेळा पाकिस्तानने आगळीक केली, त्यावेळ एकदा सर्जिकल स्ट्राइक तर एकदा एयर स्ट्राइक करून पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांना मारण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
अमित शहा नेहमी आपल्या भाषणात आलिया, मालिया, जमालियाचा उल्लेख करतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका असोत की, लोकसभा निवडणुका अमित शहा अनेक वेळा म्हणाले आहेत की, आलिया, मालिया, जमालिया' भारतात घुसून जवानांचे शीर कापून नेत होते. टॉम, डिक एंड हॅरीच्या धर्तीवर आलिया-मालिया-जमालिया शब्द गुजराती बोली भाषेत वापरला जातो.
शहा यांनी सीमा सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना तसेच पुलवामा आणि उरी घटनेवर प्रतिक्रिया देताना या ओळींचा वापर करताना दिसले आहेत. आता अमित शहा आलिया, मालिया, जमालिया वाक्याचा वापर पाकिस्तानी घुसखोरांवरही करताना दिसत आहेत. दरम्यान शहा यांनी या शब्दांविषयी सविस्तर कधी सांगितले नाही.