Open AI चा पर्दाफाश करणारा २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Open AI चा पर्दाफाश करणारा २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

Open AI चा पर्दाफाश करणारा २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

Dec 14, 2024 12:52 PM IST

Suchir Balaji Death : ओपनएआयची चौकशी करणारे व्हिसलब्लोअर सुचिर बालाजी सॅन फ्रान्सिस्कोमधील आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Open AI चा पर्दाफाश करणाऱ्या अवघ्या २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह
Open AI चा पर्दाफाश करणाऱ्या अवघ्या २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

Suchir Balaji Death : ओपनएआयवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारा अवघ्या २६ वर्षीय भारतीय-अमेरिकन एआय संशोधक सुचिर बालाजी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील बुकानन स्ट्रीटवरील फ्लॅटमध्ये सुचिरचा मृतदेह आढळला. सुचिर गेल्या ४ वर्षांपासून ओपनएआयशी संबंधित संशोधन करत होता. याशिवाय चॅट जीपीटीच्या विकासासाठीही त्यांने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी ओपनएआयवर मोठे आरोप केले होते.

चॅटजीपीटी मेकर ओपनएआयचे व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी अशी त्याची ओळख होती. सॅन फ्रान्सिस्कोमधील फ्लॅटमध्ये सूचिरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बालाजीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद माहिती आढळली नाही. प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केल्याचे दिसते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. बालाजीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने नोव्हेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ पर्यंत OpenAI सोबत काम केले.

प्रोग्रामर, पत्रकार, कलाकार यांच्या कॉपीराईट साहित्याची विनापरवानगी चॅटजीपीटीसाठी अंदाधुंद वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही होऊ शकतो. सुचिरच्या या वक्तव्यानंतर ओपनएआयवर मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय कायदेशीरदृष्ट्याही ओपनएआयला मोठा धक्का बसला होता.

दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये सापडल्याचे तपासअधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही. पोलिसांनी ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सला २३ ऑक्टोबररोजी दिलेल्या मुलाखतीत सुचिर म्हणाले की, ओपनएआय उद्योजक आणि व्यवसायांवर प्रभाव टाकत आहे. "मला वाटलं की मी ताबडतोब कंपनी सोडावी. या मुलाखतीसाठी न्यूयॉर्क टाइम्स त्याच्याकडे गेले नव्हते. हा महत्वाचा खुलासा करण्यासाठी त्यानेच स्वत: माध्यमांशी संपर्क साधला होता, अशी माहिती देखील त्याने दिली होती.

सुचिर म्हणाले होते की, ओपनएआयचे बिझनेस मॉडेल इंटरनेट इकोसिस्टमसाठी अत्यंत धोकादायक आहे. ज्यांना ते बरोबर वाटत नाही ते कंपनी सोडून जाऊ शकतात, असेही बालाजी म्हणाला होता. बालाजी यांनी यूसी बर्कले येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते. ओपनएआयमध्ये चॅटजीपीटी ट्रेनिंग देणारा डेटावर तो काम करत होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर