Indian Railways: भारतात १८५३ साली भारतीय रेल्वेची सुरुवात झाली. या ऐतिहासिक निर्णयामुळे भारतीय वाहतूक व्यवस्थेत एक नवीन क्रांती घडली. भारतीय रेल्वेमुळे मध्यमवर्गीय लोकांसाठी प्रवास करणे सोपे झाले आहे. एवढेच नव्हेतर, रेल्वेमुळे भारतातील व्यापारालाही चालना मिळाली. परंतु, तु्म्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक कोणती आहेत.
-मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक १८५३ मध्ये सुरू झाले. हे स्टेशन ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहे. कारण येथूनच भारतातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे धावली.
- १८५४ मध्ये बांधलेले हावडा जंक्शन हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे स्टेशन कोलकाताजवळील हावडा येथे आहे. हावडा जंक्शन हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.
-१८५६ मध्ये दक्षिण भारतातील पहिली ट्रेन या स्टेशनवरून प्रवासाला सुरुवात झाली. हे तामिळनाडूमधील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे आणि दक्षिण भारतातील रेल्वे प्रवासाच्या सुरुवातीचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे.
-१८७२ मध्ये बांधलेले आग्र्यातील सर्वात जुने स्टेशन आजही सेवा देत आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. हे रेल्वे स्थानक आग्राच्या प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे आणि आग्राच्या पर्यटनस्थळ ताजमहालपर्यंत पोहोचण्याचे हे एक प्रमुख साधन आहे.
-वीरंगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन, जे पूर्वी झांसी जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जात असे. हे रेल्वे स्थानक १८८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बांधले गेले. हे बुंदेलखंड प्रदेशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे. झाशी आणि त्याच्या आसपासच्या परिसरांना रेल्वे नेटवर्कशी जोडणारे हे मुख्य केंद्र असल्याने या स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
-जुने दिल्ली रेल्वे स्टेशन हे दिल्लीतील सर्वात जुने स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन १९०३ मध्ये बांधण्यात आले होते. या रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो लोक प्रवास करतात.
-१९१४ मध्ये बांधलेले लखनौ चारबाग रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात सुंदर आणि जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे स्टेशन त्याच्या भव्य वास्तुकला आणि डिझाइनसाठी ओळखले जाते. हे रेल्वे स्थानक केवळ प्रवाशांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.
-१९२५ मध्ये बांधलेले नागपूर जंक्शन हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे नागपूर शहरातील एक प्रमुख स्थानक आहे, जिथून अनेक गाड्या धावतात.
संबंधित बातम्या