‘या’ देशात चॉकलेट पाहून वेडे होतात लोक; वर्षभरात एक व्यक्ती किती किलो खातो बघा!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘या’ देशात चॉकलेट पाहून वेडे होतात लोक; वर्षभरात एक व्यक्ती किती किलो खातो बघा!

‘या’ देशात चॉकलेट पाहून वेडे होतात लोक; वर्षभरात एक व्यक्ती किती किलो खातो बघा!

Dec 14, 2024 10:01 PM IST

Chocolate Lovers: जगभरात कोणत्या देशात सर्वाधिक चॉकलेट खाल्ले जाते? त्याची यादी पाहुयात.

‘या’ देशात चॉकलेट पाहून वेडे होतात लोक
‘या’ देशात चॉकलेट पाहून वेडे होतात लोक

Trending: जगभरात चॉकलेट प्रेमी आहेत. एका अहवालानुसार, जगात तयार होणाऱ्या चॉकलेटपैकी निम्मे चॉकलेट हे पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लोक खातात. चॉकलेट खाण्यामागे अनेक कारणे आहेत. असे म्हटले जाते की चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. कारण चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. दरम्यान, कोणत्या देशातील लोक सर्वाधिक चॉकलेट खातात? याबाबत जाणून घेऊयात.

चॉकलेटप्रेमींमध्ये स्वित्झर्लंडमधील नागरिक आघाडीवर आहे. स्वित्झर्लंडमध्ये एक व्यक्ती एका वर्षात सुमारे ८.८ किलो चॉकलेट खातो. स्वित्झर्लंड हे जगातील सर्वोत्तम चॉकलेट बनवण्यासाठी देखील ओळखले जाते. सर्वाधिक चॉकलेट खपाच्या बाबतीत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मन लोक दरवर्षी सरासरी ८.४ किलो चॉकलेट खातात.

सर्वाधिक चॉकलेट कुठे खाल्ले जातात?

  • स्वित्झर्लंड- ८.८ किलो (एक व्यक्ती)
  • जर्मनी- ८.४ किलो (एक व्यक्ती
  • युके- ८.२ किलो (एक व्यक्ती)
  • नार्वे- ८.० किलो (एक व्यक्ती)
  • स्वीडन- ७.९ किलो (एक व्यक्ती)
  • डेनमार्क- ७.५ किलो (एक व्यक्ती)
  • नेदरलँड्स- ७.४ किलो (एक व्यक्ती)
  • फिनलँड- ७.२ किलो (एक व्यक्ती)
  • बेल्जिअम- ६.८ किलो (एक व्यक्ती)

स्वित्झर्लंडमध्ये इतके चॉकलेट का खातात लोक?

स्वित्झर्लंडमध्ये चॉकलेट बनवण्याची परंपरा १९व्या शतकापासून सुरू झाली आहे. हा वारसा स्विस संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. स्विस चॉकलेट त्याच्या उच्च दर्जासाठी जगभरात ओळखले जाते.स्वित्झर्लंड हे चॉकलेटबाबत आघाडीवर आहे. डॅनियल पीटरने दुधाच्या चॉकलेटचा शोध लावला आणि रॉडॉल्फ लिंडने शंखीकरण प्रक्रियेची निर्मिती यासारख्या उद्योगातील मोठ्या घडामोडींचे श्रेय देशाला दिले जाते, ज्यामुळे चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर