hijab ban in kolkata : कलकत्ता युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या एका खाजगी लॉ इन्स्टिट्यूटमधील एका शिक्षिकेला विद्यालयात हिजाब घालून येऊ नका असे सांगितल्याने या शिक्षिकेने विद्यालयात जाणे बंद केले. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा या घटनेचा अनेकांनी निषेध केला. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संवादाच्या अभावामुळे गैरसमज निर्माण झाला असल्याचे सांगितले. दरम्यान, शिक्षिका ही मंगळवारी कामावर परत येईल, असा खुलासा देखील केला.
एलजेडी लॉ कॉलेजमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अध्यापन करणाऱ्या संजीदा कादर यांनी ५ जून रोजी राजीनामा दिला. कॉलेज प्रशासनाने त्यांना ३१ मे नंतर कामाच्या ठिकाणी हिजाब न घालण्याच्या सूचना दिल्याचा आरोप कादर यांनी केला होता. "महाविद्यालयाच्या प्रशासकीय समितीच्या आदेशामुळे माझी मूल्ये व धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप त्यांनी विद्यालय प्रशासनावर केला आहे.
हे प्रकरण कळल्यावर शिक्षिकेशी बाजू घेत पश्चिम बंगालचे मंत्री व जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सिद्दीकुल्ला चौधरी म्हणाले की, कॉलेजच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांनी शिक्षिकेची माफी मागावी. महाविद्यालयीन अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) इशाऱ्यावर काम करत आहेत का, असा प्रश्न ज्येष्ठ मुस्लिम नेत्याने या प्रकरणावरून उपस्थित केला.
संस्थेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांमध्ये प्रतिगामी मूल्ये रुजवत असून त्यांना हिजाब परिधान केलेल्या शिक्षकाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, लॉ स्टडीज इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापन प्रमुख असा आदेश कसा काय देऊ शकतात? लक्षात ठेवा की अशा संस्थेत मुलांनी संविधान आणि राज्यघटनेची व कायद्याचे शिक्षण घेणे अपेक्षित आहे. शीख पुरुषांनी पगडी घालण्यास आणि स्त्रियांनी डोक्यावर दुपट्टा बांधण्यास त्यांचा आक्षेप नाही असे आपण ऐकले आहे. मग तो मुस्लिमांना का टार्गेट करत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, 'हिजाब परिधान केल्यामुळे महिलेला नोकरी सोडण्यास भाग पाडल्याप्रकरणी संबंधित संस्थेवर काय कारवाई करता येईल, यासाठी सरकारच्या वतीने मी हा मुद्दा कायदामंत्र्यांकडे मांडणार आहे.'
संजीदा मार्च-एप्रिलपासून कामावर हिजाब परिधान करत होत्या. गेल्या आठवड्यात या प्रकरणाला वेग आला. सूत्रांनी सांगितले की, संजीदा यांचा राजीनामा सार्वजनिक झाल्यानंतर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधला. केवळ संवादाच्या अभावामुळेच हा राजीनामा दिल्याचे संस्थेने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने स्पष्ट केले की, कामाच्या ठिकाणी काम करताना तिला हिजाब घालण्यास कधीही मनाई करण्यात आली नाही.
संजीदा म्हणाल्या, 'मला सोमवारी ऑफिसमधून ईमेल आला. मी त्यावर विचार करून पुढील निर्णय घेणार आहे. मात्र, आज मी कॉलेजला जाणार नाही. ईमेलमध्ये असे म्हटले आहे की सर्व प्राध्यापक सदस्यांच्या ड्रेस कोडनुसार (ज्याचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते आणि त्याचे मूल्यांकन केले जाते), मुलांना शिकवतांना वर्गात दुपट्टा किंवा स्कार्फ वापरण्यास परवानगी आहे.
कॉलेज गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष गोपाल दास यांनी पीटीआयला सांगितले की, "कोणतीही सूचना किंवा हिजाब वापरण्यास मनाई नव्हती. कॉलेजचे अधिकारी प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर करतात. मंगळवारी सजदा या पुन्हा विद्यालयात येऊन शिकवणार आहेत. त्याच्याशी आमची चर्चा झाली. सुरुवातीला काही संवाद नसल्यामुळे ही घटना घडली.
संबंधित बातम्या