मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2024 04:20 PM IST

Groom Cut Head of Bride : लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने१६ वर्षीय मुलींची धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. तिचे शीर धडावेगळं करत तो सोबत घेऊन गेला.

नवरदेवाने वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले
नवरदेवाने वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यात ठरलेले लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने १६ वर्षीय मुलींची धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की,  मुलगी अल्पवयीन असल्याने दोघांचा विवाह काही वर्षासाठी स्थगित केला होता. पोलिसांनी सांगितले की, विवाह स्थगित झाल्यानंतर ३२ वर्षीय प्रकाश मुलगी मीनाच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने मुलीच्या आई-वडिलांवर हल्ला केला व मुलीचे शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर तुटलेले शीर सोबत घेऊन गेला. ही घटना सुरलब्बी गावातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता प्रकाशनेही आत्महत्या केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

का मोडले लग्न ?
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी मुलीचा प्रकाशसोबत साखरपुडा होता. मात्र कोणीतरी चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर याची माहिती दिली. त्यानंतर बाल कल्याण विभागाचे अधिकारी अल्पवयीन मुलगी मीनाच्या घरी दाखल झाले व त्यांनी दोन्ही कुटूंबांना समजावले. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही कुटूंबांना सांगितले की, जर त्यांनी दोघांचे लग्न केले तर लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा व बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. 

दोन्ही कुटूंबाकडून विवाह स्थगित करण्यास राजी –

दोन्ही कुटूंबाने ठरवले की, मीना १८ वर्षाच्या झाल्यानंतर तिचा विवाह प्रकाशशी केला जाईल. त्यानंतर अधिकारी व नवरदेवाचे कुटूंब तेथून निघून गेले. पोलीस अधिक्षक (कोडागु) रामराजन यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता प्रकाशने मीनाच्या घरात घुसून त्याने तिच्या वडिलांना लाथ मारली व आईवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर प्रकाशने मुलीला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले व धारदार शस्त्राने हल्ला करून तिचे शीर धडापासून वेगळं केले. इतक्यावरच तो थांबला नाही तर तुटलेले शीर घेऊन तो निघून गेला. 

होणाऱ्या पत्नीची हत्या केल्यानंतर तरुण बेपत्ता - 
पोलिसांनी सांगितले की, पीडितेची आई व वडील रुग्णालयात दाखल आहेत. आरोपीला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३०२ (हत्या) तसेच पोक्सो  लैंगिक अपराधों से बच्चों का संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितेचे तीन बहिणी व दोन भाऊ आहेत. ती सर्वात छोटी होती.

IPL_Entry_Point