बंगळूरुमध्ये एक इंजिनिअर तरुणीला कमीत कमी २४ लॅपटॉप चोरण्याच्या आरोपात अटक केली आहे. २६ वर्षाच्या इंजिनिअर तरुणीने जवळपास १० लाख लाख रुपये किंमतीचे लॅपटॉप एका पीजीमधून चोरले होते. आरोपीचे नाव जस्सी अग्रवाल असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. मात्र नोकरीसाठी ती बंगळूरुला आली होती. कोरोना महामारीत तिची नोकरी गेली होती. नोकरी गेल्यानंतर तिने चोरी करण्यास सुरूवात केली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला पीजीमधून महागडे गॅजेट्स चोरी करत होती व त्यानंतर नोएडामध्ये जाऊन काळ्या बाजारात त्याची विक्री करत असे. मिळालेल्या माहितीनुसार जस्सी पीजीमध्ये कोणी नसताना कोणाच्याही खोलीत शिरत असे व खोलीतील लॅपटॉप चोरत असते. चोरीच्या घटना वारंवार घडू लागल्यानंतर पीजीकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस तपासात जस्सीचे नाव समोर आले. पोलिसांनी तिच्याकडून २४ लॅपटॉप जप्त केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जस्सी अनेक ठिकाणी जाऊन लॅपटॉप चोरत होती. पोलिसांनी अनेक सीसीटीवी फुटेजही तपासले आहेत, त्यामध्ये दिसते की, ती पीजीमध्ये कसा प्रवेश करत होती व त्यानंतर गॅझेट घेऊन बाहेर येत होती.
जस्सी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या एक मुलीने २६ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, जस्सीकडून जे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत, त्याची किंमत १० ते १५ लाखाच्या दरम्यान आहे. याबरोबरच खूप गॅझेट तिने यापूर्वी विकले आहेत. जस्सी २०२० पासून चोरी करत आहे. पोलिसांनी सांगितले की, याचा तपास केला जात आहे की, जस्सी एखाद्या टोळीशी तर जोडलेली नाही?