WhatsApp मध्ये आले भन्नाट फीचर! व्हॉइस मेसेज पाठवणे आता होणार मजेशीर-whatsapp users can now send voice message as view once ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp मध्ये आले भन्नाट फीचर! व्हॉइस मेसेज पाठवणे आता होणार मजेशीर

WhatsApp मध्ये आले भन्नाट फीचर! व्हॉइस मेसेज पाठवणे आता होणार मजेशीर

Dec 09, 2023 12:22 PM IST

WhatsApp new voice messing feature: व्हॉट्सअ‍ॅपने आता यूजर्ससाठी भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आता ऑडिओ मेसेजवर 'view once' असे चिन्हांकित करून पाठवू शकणार आहेत. कंपनीने हे फीचर अ‍ॅपमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. हे संदेश एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहेत.

Whatsapp
Whatsapp (PTI)

WhatsApp new voice messing feature : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सचा चॅटिंग अनुभव सुधरवण्यासाठी नवनवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये आणत आहे. चॅटिंगचा अभुबव आणखी भन्नाट करण्यासाठी आता खास फीचर आणले आहे. हे फीचर जबरदस्त असून याच्या मदतीने यूजर्स आता ऑडिओ मेसेजवर 'viwe once' असे चिन्हांकित करून पाठवू शकतील. कंपनीने हे फीचर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणण्यास सुरुवात केली आहे.

NIA Raid : एनआयएची कर्नाटक, महाराष्ट्रात मोठी कारवाई! ४० ठिकाणी छापे टाकत ७ ते ८ जणांना अटक

व्ह्यू वन्स वैशिष्ट्य प्रथम फोटो आणि व्हिडिओसाठी आणले गेले. यानंतर आता मेसेससाठी देखील हे फीचर वापरता येणार आहे. एकदा पहा हे फीचर वापरल्यावर मेसेज प्राप्तकर्त्याने पाहिल्यावर फोनवरून आपोआप गायब होतात. या नव्या फीचार बाबत व्हॉट्सअ‍ॅप म्हणते की व्ह्यू वन्स व्हॉईस मेसेज डीफॉल्टनुसार एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केलेले असतील.

WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीगचा लिलाव किती वाजता सुरू होणार? कोणत्या चॅनेलवर दिसणार? पाहा

व्ह्यू वन्स संदेश पाठवण्यासाठी, या पद्धती फॉलो करा

१ - सर्व प्रथम ग्रुप किंवा वैयक्तिक चॅट बॉक्स उघडा.

२ - यानंतर मायक्रोफोनवर टॅप करा.

३- रेकॉर्डिंग लॉक करण्यासाठी वर स्वाइप करा.

४- रेकॉर्ड बटण टॅप करा आणि धरून ठेवा.

५ - बटण हिरवे झाल्यावर व्यू वन्स मोड चालू होईल.

६ - आता हा व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी सेंड बटणावर टॅप करा.

७- हा मेसेज ऐकल्यानंतर तो रिसीव्हरच्या फोनवरून आपोआप डिलीट होईल.

व्यू वन्स मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी हा पर्याय निवडावा लागेल. एकदा पाहिल्यानंतर, हा मेसेज प्राप्तकर्त्याद्वारे पुन्हा पाहू शकला जाणार नाही. विशेष म्हणजे हा मेसेज रिसिव्हरच्या फोनमध्येही सेव्ह होणार नाही. तुम्हाला तुमच्या फोनवर पाहण्यायोग्य व्हॉइस मेसेज मिळाल्यास, तुम्ही तो १४ दिवसांच्या आत ऐकला पाहिजे. अन्यथा, हा मेसेज १४ दिवसांनंतर आपोआप गायब अथवा डिलिट होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बॅकअप दरम्यान न उघडलेले व्हॉइस मेसेज पन्हा मिळवले जाऊ शकतात.

Whats_app_banner
विभाग