मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  whatsapp new features : व्हॉट्सॲप युजर्सची होणार चंगळ! स्टेटस अपडेटसाठी येणार आतापर्यंतचे सर्वात भन्नाट फीचर

whatsapp new features : व्हॉट्सॲप युजर्सची होणार चंगळ! स्टेटस अपडेटसाठी येणार आतापर्यंतचे सर्वात भन्नाट फीचर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 19, 2024 10:12 AM IST

whatsapp new features : व्हॉट्सॲपने आपल्या यूझर्ससाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरमुळे स्टेटस अपडेटसाठी आतापर्यंतचे सर्वात छान वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲपने आपल्या यूझर्ससाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरमुळे स्टेटस अपडेटसाठी आतापर्यंतचे सर्वात छान वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.
व्हॉट्सॲपने आपल्या यूझर्ससाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरमुळे स्टेटस अपडेटसाठी आतापर्यंतचे सर्वात छान वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.

whatsapp new features : मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपची सर्व जगात क्रेझ आहे. संदेशवहनासाठी प्रामुख्याने या ॲपचा वापर करण्यात येतो. व्हॉट्सॲप आता वापरकर्त्यांसाठी नवे फीचर आणत आहे. हे नवे फीचर यूझर्सना मोठ्या प्रमाणात भुरळ घालतांना दिसत आहे. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणे हे एक अनेकांचं आवडतं काम असतं. आता त्यांचा हा अनुभव आणखी सुधारणार आहे. कारण व्हॉट्सॲपने स्टेट्स अपडेटसाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

नवीन फीचरच्या मदतीने युजर्स स्टेटस अपडेटमध्ये एक मिनिटाचे व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. आत्तापर्यंत कंपनी स्टेटस अपडेटमध्ये फक्त ३० सेकंदाचे व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध होता. WABetaInfo ने X पोस्ट करून व्हॉट्सॲपमधील या नवीन फीचरची माहिती दिली आहे.

व्हॉट्सॲप सध्या अनेक नव नवीन फीचर्सवर काम करत आहे. गेल्या काही दिवसात कंपनीने अनेक नवीन फीचर्स यूझर्ससाठी आणले आहेत. या मालिकेत कंपनीने आता स्टेटस अपडेटसाठी सर्वात दमदार फीचर आणले आहे. नवीन फीचरच्या मदतीने युजर्स स्टेटस अपडेटमध्ये एक मिनिटाचा व्हिडिओही शेअर करू शकतील. आत्तापर्यंत कंपनी स्टेटस अपडेटमध्ये फक्त 30 सेकंदाचे व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय देत होती. WABetaInfo ने X पोस्ट करून व्हॉट्सॲपमधील या नवीन फीचरची माहिती दिली. या पोस्टमध्ये WABetaInfo ने WhatsApp च्या या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

रिपोर्टनुसार, कंपनी हे नवीन फीचर बीटा यूजर्ससाठी आणत आहे. तुम्ही बीटा वापरकर्ता असल्यास, तुम्ही Android 2.24.7.6 साठी WhatsApp बीटामध्ये हे अपडेट तपासू शकता. कंपनीने हे फीचर फक्त काही बीटा यूजर्ससाठी जारी केले आहे. युजर्सची प्रचंड मागणी लक्षात घेऊन हे नवीन फीचर तयार करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून स्टेटस अपडेटमध्ये मोठे व्हिडिओ शेअर करण्याच्या पर्यायाची मागणी यूजर्स करत होते. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे नवे फीचर वापरण्यास आणखी सोपे होणार आहे.

QR कोड स्कॅन करण्यासाठी नवे वैशिष्ट्य

UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन कण्याचे नवीन फीचर WhatsApp मध्ये येत आहे. WABetaInfo नुसार, कंपनी या फीचरची बीटा चाचणी करत आहे. नवीन फीचर वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्येच QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय देते. यासाठी चॅट लिस्ट स्क्रीनच्या वरच्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्या पुढे एक नवीन आयकॉन दिसेल. WABetaInfo ने आपल्या पोस्टमध्ये याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. कंपनी Android 2.24.7.3 साठी WhatsApp Beta मध्ये हे वैशिष्ट्य आणत आहे. कंपनी लवकरच या फीचरची बीटा चाचणी पूर्ण करणार आहे. यानंतर या नवी आवृत्ती जागतिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग