व्हॉट्सअ ॅपने वापरकर्त्यांचा अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशाने नवीन वर्षात काही अपडेट्स आणले आहेत. यात सर्वात महत्वाचे फिचर म्हणजे व्हॉट्सअपवर आलेल्या प्रतिक्रियांवर आता नुसतं डबल टॅप करून त्वरित उत्तर देता येणार आहे. नव्या रिअॅक्शन फीचरव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपने इतरही अनेक सुधारणा केल्या आहेत. या नव्या फिचर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा इफेक्ट्सची जोड देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलसाठी उपलब्ध करण्यात आलेले सर्व ३० बॅकग्राऊंड, फिल्टर आणि इफेक्ट्स आता इमेजेससाठी देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपने २०२४ साली व्हिडिओसाठी हे फिचर लागू केले होते. आता पहिल्यांदा ते फोटोसाठीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नवीन फीचरद्वारे व्हॉट्सअपचे वापरकर्ते इमेजेसना सहज क्रिएटिव्ह टच देऊ शकतात. व्हॉट्सअॅपवर आता पर्सनलाइज्ड स्टिकर्स तयार करणे आणि शेअर करणे सोपे झाले आहे. युजर्स आता फक्त 'क्रिएट स्टिकर' या पर्यायावर टॅप करून सेल्फीला कस्टम स्टिकरमध्ये बदलू शकतात.
एकदा सिलेक्ट झाल्यानंतर कॅमेरा फंक्शन युजर्सला जागेवरच सेल्फी घेण्याची परवानगी देते. नंतर स्टिकरमध्ये रुपांतरित केले जाते. हे फीचर सध्या अँड्रॉइड डिव्हाइसवर रोलआउट केले जात असून लवकरच आयओएस युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
याव्यतिरिक्त, वापरकर्ते आता संपूर्ण स्टिकर पॅक थेट व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करू शकतात. यामुळे यूजर्सना आपले पर्सनलाइज्ड किंवा आवडते स्टिकर संग्रह मित्र आणि कुटुंबियांना पाठविणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
संबंधित बातम्या