WhatsApp Update : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कंपनीने एक भन्नाट फीचर आणले आहे. व्हॉट्सॲप गेल्या काही दिवसांपासून सतत नवीन फीचर्स अपडेट करत आहे. यामुळे वापरकर्त्यांचा व्हॉट्सॲपचा अनुभव आनंददाई ठरत आहे. बीटा आणि स्थिर आवृत्त्यांसाठी येणारी नवीन वैशिष्ट्ये व्हॉट्सॲपचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार बनवत आहेत. आता या मालिकेत, व्हॉट्सॲपने मागील आठवड्यात iOS साठी WhatsApp बीटा साठी नवीन स्टिकर निर्मिती शॉर्टकट फीचर आणले आहे आता कंपनी अँड्रॉईड यूजर्ससाठी अशाच प्रकारचे फीचर घेऊन आली आहे.
WABetaInfo नुसार, कंपनी Android वापरकर्त्यांसाठी स्टिकर निर्मिती शॉर्टकटचे नवीन फीचर व्हॉट्सॲपने लॉंच केले आहे. याचे अपडेट देखील पले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे नवे फीचर WABetaInfo द्वारे Android २.२४.१०.२३ साठी WhatsApp बीटा मध्ये स्पॉट केले गेले आहे. हे अपडेट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
WABetaInfo ने या अपडेटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सॲपने सामान्य स्टिकर क्रिएशन टूलला AI बेस्ड स्टिकर क्रिएशन फीचरपासून वेगळे केले आहे.
iOS प्रमाणे, Android वापरकर्त्यांना फोटो लायब्ररीमधून वैयक्तिकृत स्टिकर्स तयार करण्याचा पर्याय आता वापरता येणार आहे. एआय जनरेट केलेले स्टिकर्स तयार करून ते आता पाठवता येणार आहे. यासाठी फोन स्क्रीनवर दोन पॉप-अप दिसतात. यामुळे वापरकर्त्यांना एआयबेस स्टिकर पर्याय पटकन दिसत असल्याने खूप गोंधळ निर्माण होत होता. मात्र, नव्या बीटा अपडेटमध्ये हा दोष दूर करण्यात आला आहे.
काही देशांच्या बीटा वापरकर्त्यांसाठी वैशिष्ट्य उपलब्ध: नवीन बीटा अपडेटमध्ये, वापरकर्त्यांना फोटो लायब्ररी आणि AI मधून स्टिकर्स तयार करण्यासाठी स्वतंत्र पर्याय मिळत आहे. जर तुम्ही बीटा वापरकर्ता असाल, तर तुम्ही Android २.२४.१०.२३ साठी WhatsApp बीटा इंस्टॉल करून हे नवे फीचर वापरू शकता. कंपनीने हे फीचर फक्त काही देशांच्या बीटा यूजर्ससाठी आणले आहे. अशा परिस्थितीत, नवीन स्टिकर शॉर्टकटसाठी वापरकर्त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे मानले जाते की बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर, कंपनी जगभरातील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी या फीचरची नवी आवृत्ती आणणार आहे.